
आज लढलो तर टिकलो.. नाहीतर संपलो
_भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन २९ जुलै रोजी_
गजानन ढाकुलकर
नागपूर: महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय दंगलखोरांना क्लीनचिट मुख्यमंत्र्यांचे १२५ गुन्हे रद्द. गृहमंत्र्यांच्या ठराविक जातसमूहाचे गुन्हे रद्द मग भीमसैनिकांनाच शिक्षा का? जयभीमची घोषणा देत आंदोलन करणे गुन्हा आहे का? याबाबत २९ रोजी आंदोलन करण्यात येत आहे.
भिमाकोरेगाव ३५००० भीमसैनिक आंदोलकांवरील गुन्हे राज्य सरकारने स्वतंत्र जीआर काढून रद्द करावे. भीमसैनिक, विध्यार्थी, वृद्ध जेष्ठ, महिला निरपराधांचे गुन्हे रद्द करा. तामसा नांदेड २६ भीमसैनिकांची निर्दोष मुक्तता झालीच पाहिजे. कलम ३५३ चा गैरवापर थांबलाच पाहिजे. आमची कायदेशीर हत्या थांबवा असे दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.