महाराष्ट्र राज्यात मंत्री पदासाठी १०० कोटी ?

महाराष्ट्र राज्यात मंत्री पदासाठी १०० कोटी ?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- १०० कोटी रुपये सामान्य माणसाला चक्कर आणणारे आहे.पण चोरांना सवयीचे झाले आहे.१०० कोटी फक्त मुंबई डान्सबार ची मासीक वसुली होती. तर वर्षाची किती होत असेल ? हे बींग फुटले म्हणून माहिती पडले.म्हणून वसुल मंत्री जेलमधे गेले.पण हे आता महाराष्ट्र राज्याच्या सरकार मधे नवीन राहिले नाही.उद्धव ठाकरेंना माहिती आहे.देवेंद्र फडणवीस यांनाही ज्ञान आहेच.एकनाथ शिंदेंना सवय असेलच. ही बातमी नाही.ही न्यूज नाही.ही आहे पद्धत, परंपरा.ज्याला इंग्रजी शिकलेले भित्री माणसे सिस्टीम म्हणतात.या सिस्टीम मधे स्वताला सेट करण्याचा प्रयत्न करतात.१००कोटीचा भुगा जरी सापडला तरी तो पाळधी, पाचोरा किंवा पारोळा येथे सात पिढ्यांची तजबीज करू शकतो.म्हणून तर आमदार सोबत कार्यकर्ते दंड बैठका घालत आहेत.

एक साधा आमदार गेला तरी पांचशे कोटी युं घेऊन येतो.म्हणे विकास करायचा आहे.विकास वगैरे बहाणा असतो,तो आमदार तितकाच शहाणा असतो.कुदळ मारणे,फित कापण्याचे कार्यक्रम करून मुर्खांना उंगलीवर यूं नाचवतो.हा कोंड्या खुशाल स्वताच अंगावर गुलाल उधळतो.आताच राजू मामा आणि किशोर आप्पा यूं कोटी कोटी घेऊन सुद्धा आलेत.पण कुठे खर्च केलेत ते सांगणार नाहीत.जर हे इतके आणतात तर गुलाबराव पाटलांनी किती कोटी आणले असतील ?कुठे खर्च केले ? कोणालाही सांगितले नाही.पुरावा आहे , जळगाव मधील उखडलेले रस्ते.आणि गंज चढलेल्या पाणीपुरवठा योजना,कोरोनाची बोगस खरेदी.डीपीडीसी च्या माध्यमातून मोठा खजिना जिल्हात येतो.सामान्य जनतेला माहिती पडत नाही,कुठे किती खर्च केलेत? कुठे कुठे रस्ते बनवलेत ?कुठे कुठे दिवे लावलेत पालकमंत्री, कलेक्टर, आणि इतर आमदार हे सर्व गौडबंगाल कोणालाही सांगत नाहीत.अमावश्येला वडाच्या झाडाखाली रात्री वाटणी होते.कशी होते ?कोण किती घेतो?हे अद्याप कोणीही पालकमंत्री ने सांगितले नाही.ना खडसे,ना देवकर ,ना महाजन,ना गुलाबराव.येथे सर्वच एकाच माळेचे मणी असतात.खडसे अनेक सीड्यांची वाच्यता करतात पण याबाबत चकार शब्द बोलत नाहीत.देवकर सांगत नाहीत.महाजन आणि गुलाबराव कशाला सांगतील ? त्यासाठी एखादा उघड्या तोंडाचा आमदार निवडून देणे आवश्यक आहे. एका वर्षात चारपाच हजार कोटीची विल्हेवाट लावण्यासाठी मंत्री पद मिळणे खूप आवश्यक असते. पालकमंत्री बनले कि,सर्वच माल आपलाच .

पंधरा वीस हजार पगाराच्या सिपाईच्या पदासाठी दहा-बारा लाख तर कोणीही मोजतो.तर मग, वर्षांत चार-पाच हजार कोटींचा मालक बनण्यासाठी १०० कोटी मोजणे विशेष नाही.आणि असा हा प्रामाणिक चोर आपल्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतो.हे जनतेच्या ध्यानीमनीही नसते.काही क्रुकेड विचारतात,काय पुरावा ? मंत्रीकडे संपत्ती जमा झाली,हाच तर पुरावा असतो.पोटात बाळ असणे हा सुहागरात चा पुरावा नसतो का ? मंत्री मालामाल झाला हाच चोरीचा पुरावा नसतो का? खात्री करायची असेल तर मंत्रीला इडी कडे सोपवले कि,पुरावाच पुरावा सापडतो.इडी ने मंत्रीला खुर्चीवर बसवून प्रश्न करण्यापेक्षा मंत्रीला उलटे लटकावून विचारले तर नोटा पडतील.तेथेच पोते भरतील. अशी सणसणीत माहिती प्रकाशीत करण्या करीता महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव चे शिवराम पाटील यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles