
आर्य वैश्य युथ क्लबच्या सदस्यांनी सांभाळला पदभार
नागपूर: आर्य वैश्य युथ क्लब वर्ष 22 ते 24 नवीन कार्यकारणीचे पदग्रहण समारंभ नुकताच झालेल्या २४ जुलै रोजी संपन्न झाले असून नवनिर्वाचित कार्यकारणीचे अध्यक्ष स्वप्निल कल्लुरवार तर सचिव स्वप्निल डुबेवार यांची निवड झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून महाराष्ट्र लोकलेखा समितीची अध्यक्ष माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित होते.
तसेच गणेश चक्करवार चेअरमन नॉमिनेशन कमिटी आर्य वैश्य युथ क्लब तसेच सर्व माजी अध्यक्ष हजाराहून अधिक समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व परिचय अजय गंपावार यांनी करून दिला. नवीन कार्यकारिणीच्या सोबतच भविष्यातील उपक्रमाची माहिती सुद्धा दिली. कार्यकारणीत कोषाध्यक्ष आशिष कोमावार, पूर्व अध्यक्ष प्रशांत पत्तीवार, CO डॉ.शैलेंद्र गंजेवार, MO अनिरुद्ध कुणावर, अभिषेक बोंगिरवार, MO एस. पद्मावार, CO नितीन उपलंचीवार, CO पंकज गोनपल्लीवार, सहसचिव विश्वास भटपल्लीवार, विजय उपलंचीवार, गोपाल गादेवार, डायरेक्टर रोहन चिंतावार व अद्वैत यमसनवार, CO आदित्य निलावार, प्रोजेक्ट सुशांत सिद्धमशेट्टीवार, PRO सुशांत गंगमवार यांचा समावेश आहे.
मुख्य अतिथींनी नवीन कार्यकारणीला जीवनात सर्वत्र क्षेत्रांमध्ये शिस्तीसह समिती आणि न्याय लक्षात घेत जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन केले. सोबतच नवनिर्वाचित कार्यकारणीला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यात. व कार्यक्रमाची सांगता झाली.