Home कोकण साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित व्हायला हवे; राजश्री बोहरा

साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित व्हायला हवे; राजश्री बोहरा

106

साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित व्हायला हवे; राजश्री बोहरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सचिन पाटील (अलिबाग)

रायगड: साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित होऊन विविध साहित्यिक उपक्रम राबवले पाहिजेत. संमेलने भरवून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक व संमेलन अध्यक्षा सौ. राजश्री बोहरा यांनी दुसरे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

नुकतेच डोंबिवलीच्या सांस्कृतिक भूमीवर दुसरे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश च्या ठाणे जिल्हा विभागाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . समाजात घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी शब्द चित्रण साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून करावयास हवे असे वक्तव्य श्री शरद गोरे यांनी आपल्या भाषणात केले.

सुप्रसिद्ध साहित्यिका हिरकणी राजश्री बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. तर स्वागताध्यक्ष पदाची धुरा सुप्रसिद्ध साहित्यिका कवयित्री अनिता गुजर यांनी सांभाळली. आपल्या कुशल नेतृत्व गुणाने या संमेलनाचे आयोजन त्यांनी केले. कवी नवनाथ ठाकूर हे कविसंमेलनाचे अध्यक्ष होते.
स्थानिक नगरसेवक उद्योगपती बाबाजी पाटील यांनी संमेलनास विशेष उपस्थिती लावली. परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे उपस्थित होते.

अविनाश ठाकूर, मुग्धा कुंटे, राधिका बापट, डॉ मीना बर्दापूरकर या ठाणे जिल्हा कार्यकारिणीने संमेलनाचे उत्तम आयोजन व नियोजन केले होते.प्रतिक नागोळकर, स्मिता धुमाळ, हरिश्चंद्र दळवी, संदीप पाटील, उज्ज्वला लुकतुके, रतन याडकिकर या कल्याण डोंबिवली महानगर कार्यकारिणीने संमेलनास मोलाचे सहकार्य केले.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून तब्बल ८८ कवींनी या संमेलनात सहभाग नोंदवला. तसेच कोकण, पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बुलढाणा, लातूर, अशा विविध जिल्ह्यातून परिषदेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री बाळासाहेब तोरसकर, श्री नामदेव राठोड, श्री. माणिकराव गोडसे, श्री संदीप तोडकर, प्रा नितीन नाळे, श्री कुलदीप रुघे, सौ गीतांजली वाणी,श्री विठ्ठल घाडी, सौ. जान्हवी कुंभारकर, सौ मनिषा साळवे, श्री भारत घेरे, सौ उषा राऊत, सौ शोभा गायकवाड, श्री सुनील पवार, ,सौ सारिका चव्हाण, श्री उदय क्षीरसागर, श्री मुकुंद देवरे इत्यादी प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित होते.

श्री जयंता पाटील, श्री मंगेश म्हात्रे, श्री राजेन्द्र पाटील यांना नवीन पद नियुक्ती देण्यात आली. काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सारस्वतांना पुरस्कृत करण्यात आले. शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सर्वांना गौरविण्यात आले. उपस्थितांना नाश्ता, प्रितिभोजन, चहा – पाणी, अशी सोय करण्यात आली होती. अतिशय दिमाखदार, नयनरम्य असा भव्य दिव्य साहित्य सोहळा या संमेलनाच्या निमित्ताने संपन्न झाला. आलेला प्रत्येक व्यक्ती आनंद आणि उत्साहाची भरघोस शिदोरी सोबत घेऊन गेला.