राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीणची कार्यकारिणी बैठक व स्नेह-मिलन संपन्न
गजानन ढाकुलकर
नागपूर :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी बैठक आज दि ३० जुलै रोजी गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री. आशिष पुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या वेळी प्रामुख्याने माजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. श्यामभाऊ मंडपे, राम बंग, सौरभ बंग, पंकजभाऊ नंदनवार ,दिनेश साळवे, कपिल वानखेडे, विनोद गोडबोले, खुशाल मंडलिक, मकसूद शेख, आशिष पवणे, लॉकेट वाघमारे, रोहन पालटकर, अनुप डाखळे, परीक्षित वानखेडे, विक्की थापा, संदीप ठाकरे, राजेंद्र वगरे, अजय कथाने, मंगेश शेंडे, प्रफुल काकडे, प्रदीप फलके, तुषार गुंडरे, अविनाश बांगरे ,उपदेश ऊमाटे ,शुभम कोंढ़लकर आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.