
९ ऑगस्टला, जागतिक आदिवासी दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर करावी
प्रतिनिधी नागपूर
नागपूर: गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्च्या च्यावतीने आणि आदिवासी बांधवा तर्फे 2 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले की, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे या दिवशीची शासकीय सुट्टी जाहीर करावी. या बाबतीत निवेदन देण्यात आले.
९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस आहे. आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, त्यांच्या जल-जंगल, व जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा. त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, अस्तित्व आत्मसन्मान अस्मिता जिवंत राहावी. यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो. हा दिवस आदिवासीचा आत्मसन्मान जपणाऱ्या आणि अस्मिता पुरविणाऱ्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ९ ऑगस्ट हा दिवस, जगभरातील आदिवासी बांधव “जागतिक आदिवासी दिवस ” म्हणून साजरा करतात.
संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ने हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केल्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्य साधारण असे आहे. आणि हा दिवस त्यांचे करिता महत्वाचा असुन तो दिवस साजरा करण्याकरिता शासकीय सुट्टी असली पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी कर्मचारी सुध्दा हा दिवस साजरा करू शकतील. दरवर्षी ९ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी असावी असे जाहीर करण्यात यावी. याकरिता गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ठ, गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा यांच्याकडून मंगळवारी दिनांक 2/8/2022 रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिमाताई मडावी (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा गोंगपा) अॅड. आशीष ऊके (महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता) गंगाताई टेकाम (नागपूर जिल्हा अध्यक्षा) सुनिता ताई ऊईके (संघटक जिल्हा नागपूर) सौरभ मसराम (युवा जिल्हा अध्यक्ष नागपूर) दिनेश शिडाम (शहर अध्यक्ष नागपुर) सतिश नाईक (युवा शहर अध्यक्ष नागपूर) रामभाऊ भलावी, यशवंत कोकोडे, सेवकराम टेकाम, अरुण जुगनाके, सतीश डोंगरवार, राजेश ऊईके, मनीष धुर्वे, चेतन परतेकी, ज्ञानेश्वर कुमरे, राधेश्याम मडावी व समस्त कार्यकर्ता उपस्थित होते.