
कर्मचाऱ्यांना अधिकार व महिलांना संरक्षण मिळेपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य मान्य होऊ शकत नाही- राजेंद्र साठे
_मूठभर उद्योगपत्यांची तिजोरी भरण्याचे काम मोदी सरकार करत आहे._
प्रतिनिधी नागपूर
नागपूर : आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जेव्हा पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही व देशातील महिलांना पूर्णपणे संरक्षण मिळत नाही किंवा पर्यंत पूर्णपणे स्वातंत्र्य मानता येणार नाही. सिटू तर्फे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ व्या वर्धापन दिन अभियान निमित्त भिवापूर येथे एका जाहीर सभेमध्ये आशा वर्कर व अंगणवाडी कर्मचारी याना कॉ.राजेंद्र साठे यांनी मार्गदर्शन केले.
त्याला इंग्रजांकडून मुक्त करण्याकरिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्वप्न बघितले होते ते स्वातंत्र्याला ७५ वर्ष होऊन सुद्धा पूर्ण होऊ शकलेले नाही शेतकरी शेतमालाला योग्य भाव मिळावा त्याकरता संघर्ष करत आहेत आणि आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत शेतमजूर पेन्शन योजना लागू व्हावी याची वाट बघत आहेत कामगारांची दशा दिवसेंदिवस बहिणी होत चाललेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा केव्हा मिळेल याची वाट बघत आहे.
महागाई भरमसाठ वाढलेली आहे. गरीब आणखी गरीब होत आहे आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेला आहे आणि मूठभर उद्योगपत्यांची तिजोरी भरण्याचे काम ही मोदी सरकार करत आहे. आजही महिलांवरील अत्याचार थांबलेले नसून अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहेत आणि अत्याचारी लोकांना मोदी सरकार राजकीय संरक्षण देणे चालू आहे. राजकीय देशातून इतर सर्व पक्षांना ईडीचा धाक दाखवून संपवण्याच्या प्रयत्न करीत आहेत तर काही लोकांच्या तिजोऱ्या सरकारी उद्योग विकून काही उद्योगपतींच्या तिजोऱ्या भरण्याचे काम चालू आहे.
कार्यक्रमाच्या समापन नंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन एक वेगळी स्वतंत्र नितीन घेण्यात आली त्यामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. वरील कार्यक्रमाला कॉ.मोहम्मद ताजुद्दीन, कॉ. दिलीप देशपांडे , कॉ.राजेंद्र साठे, कॉ.चंदा मेंढे , कॉ.मंगला जूनघरे, कॉ.अनिता जनबंधू, कॉ. संगीता मेश्राम सोबत शेकडो आशा व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.