
चंद्रशेखर जोशी यांच्या पुस्तकाचे 6 ला प्रकाशन
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर जोशी यांच्या ‘नीर-क्षीर’ लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवार, 6 आॅगस्टला सायंकाळी 5 वाजता सिव्हिल लाईन्समधील पत्रकार क्लब येथे होत आहे.
ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होईल. आपल्या दीर्घ कारकीर्दीत जोशी यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह असलेले हे पुस्तक मुंबईच्या सदामंगल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.