‘ग्लोबल टीचर डिसले गुरुजी’चा राजीनामा अखेर नामंजूर

‘ग्लोबल टीचर डिसले गुरुजी’चा राजीनामा अखेर नामंजूर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोलापूर: ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांचा राजीनामा अखेर नामंजूर करण्यात आला. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी हा राजीनामा नामंजूर केला. प्रशासकीय कारणामुळे डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असल्याबाबत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर दोन वर्ष गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांसंदर्भात त्यांच्यावर चौकशी समिती देखील गठीत केली होती. या समितीच्या अहवालमध्ये देखील डिसले यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. यांनतर रणजितसिंह डिसले यांनी आपल्या सहशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. 8 ऑगस्ट पर्यंत डिसले यांना राजीनामा मागे घेण्याची संधी होती. मात्र डिसले यांनी आतापर्यंत आपला राजीनामा मागे घेतलेला नव्हता. रणजितसिंह डिसले यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केलेला होता, मात्र या अहवालातील निष्कर्ष चुकीचे असल्याचे आढळले होते.

त्यानंतर डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. डिसले यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानंतर डिसले राजीनामा मागे घेणार की त्यांचा राजीनामा नामंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आज अखेर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा प्रशासनानेच नामंजूर केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles