‘गुगळे’ काकांचा जावई शोध, म्हणे देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

‘गुगळे’ काकांचा जावई शोध, म्हणे देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्रीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राज्यात महिन्याभरापासून अभूतपूर्व राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व बंड, भाजपासोबत शिंदे गटाचा तह आणि अविश्वसनीय शपथविधी. या सगळ्यामध्ये चर्चा होती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची. अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांची गुगलने जावई शोध लावत एक वेगळीच ओळख करून दिली आहे.

फडणवीस मुख्यमंत्री होणारच असा ठाम विश्वास राज्याला असताना आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आहोत आणि आपण त्यांना बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिली. शपथविधीची वेळ जवळ आली. संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारच होते आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये डाव पलटला.थेट भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लागली.

अशा रितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांची गुगलने एक वेगळीच ओळख करून दिलीये. गुगल सर्च केलं असता, देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती मिळत आहे. आता ही गुगलची चूक आहे का कोणीतरी खोडसाळपणा करून गुगलची दिशाभूल केलीय, ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे. एवढ्या नाट्यमय संघर्षानंतर शाळेतल्या लहान मुलालाही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं कळलंय, आता गुगललाही लवकर जाग यावी, हीच आशा!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles