कोमसाप मुरुड-जंजिरा शाखेतर्फे “श्रावणसरी” मैफिल संपन्न

कोमसाप मुरुड-जंजिरा शाखेतर्फे “श्रावणसरी” मैफिल संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सचिन पाटील (अलिबाग)

रायगड: कोकण मराठी साहित्य परिषद, मुरुड शाखेतर्फे दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी मुरुड-जंजिरा नगरपरिषद प्रशासनाधिकारी दीपाली दिवेकर यांच्या निवासस्थानी श्रावण मासाचे औचित्य साधून श्रावणसरी ह्या साहित्यिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावणसरी मैफिलीची सुरुवात कोमसाप मुरुड-जंजिरा शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, कार्याध्यक्ष अरुण बागडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र नामजोशी व दीपाली दिवेकर मॅडम यांच्या मातोश्री यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून केली. यजमान दीपाली दिवेकर यांच्यातर्फे दर्जेदार पुस्तके देऊन उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्रावणातील आठवणी कथन, काव्यवाचन, काव्यगायन, गप्पा, गाणी अशा मुक्त मैफिलीला सुरुवात झाली.
सदर मैफिलीची सुरवात सर्व उपस्थितांनी ईशास्तवन गाऊन केली. सर्वप्रथम कार्याध्यक्ष अरुण बागडे यांनी श्रावणात घननिळा ह्या सुमधुर गाण्याने कार्यक्रमाची सुरवात केली.

यानंतर शास्त्रीय मैफिलिची सुरेल सुरुवात जेष्ठ शास्त्रीय गायक डॉ.रवींद्र नामजोशी यांनी पावसावरील सुमधुर गीताने केली त्यानंतर हाच शास्त्रीय संगीताचा माहोल शास्त्रीय संगीत गायिका प्रतिभा मोहिले यांनी एक गीत सादर करत पुढे नेला. यानंतर काव्य मैफिल सुरु झाली संजय गुंजाळ, आशिष पाटील, उषा खोत, वासंती उमरोटकर, वैशाली कासार, प्राची दिवेकर, दीपाली दिवेकर, सिद्धेश लखमदे, उर्मिला नामजोशी यांनी श्रावण व पावसावरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

मैफिलीसाठी मुरुडमधील प्रसिद्ध रांगोळीकार, चित्रकार महेंद्र पाटील सर यांनी प्रभावी सुलेखन कसे करावे याचे थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच त्यांनी केलेल्या सुलेखनाचे काही नमुनेही दाखवले. श्रावणसरी मैफिलीचे सूत्रसंचालन सौ.उर्मिला नामजोशी मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्षा उषा खोत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles