
ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन सोहळा साजरा
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
हिंगणा :- स्वामी विवेकानंद युथ मल्टीपर्पज सोसायटी हिंगणा द्वारे संचालित ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूलमध्ये रक्षा बंधन सोहळा आज दि १०/०८/२२ रोजी साजरा करण्यात आला. सोबतच रक्षा बंधन निमित्त राखी मेकिंग कॉम्पिटिशन सुद्धा आयोजित करण्यात आली.
चिमुकल्या भगिनींनी लाडक्या बंधू राजाला त्यांच्या हातावर राखी बांधली. तसेच आपल्या भावा-बहिणींचे प्रेम हे असेच अटुट राहील अशी हमी चिमुकल्या मुलांनी एक दुसऱ्यांना दिली व एक दुसऱ्याचे तोंड गोड करत मुलांनी एक – दुसऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच याबरोबर राखी मेकिंग स्पर्धा सुद्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये नर्सरी क्लास मध्ये प्रथम क्रमांक शिवांश पटले व द्वितीय क्रमांक वंश खोब्रागडे, तर तृतीय क्रमांक धानी आळे व के.जी. वन. मध्ये प्रथम क्रमांक दर्शन यादव व द्वितीय क्रमांक पुनम मलघाटी तर तृतीय क्रमांक यतिक तुरविले आणि के.जी. टू.मध्ये प्रथम क्रमांक नील सोनटक्के व द्वितीय क्रमांक सृष्टी अडमे व तृतीय क्रमांक तानिया कावळे तसेच प्रोत्साहन पर म्हणून स्वरा मरठे हे मानकरी ठरले या कार्यक्रमाला अश्विनी माटे,हिना रिहल, प्रतीक्षा राऊत, आरती चौरे, नेहा बोपचे, अनिता टेंबरे,सर्व पालक, शिक्षिका उपस्थित होते तसेच अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक मा.कमलेशजी खोब्रागडे उपस्थित होते.