‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचनाकार

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : श्रावणसरी🥀*
*🍂बुधवार : १०/ ०८ /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या तसेच नवीन सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*श्रावणसरी*

अवखळ चंचल श्रावणसरी
तेज झळके तव वदनावरी
यौवनाची नशा तव देहावरी
पाऊसधार कि तू गं परी|१|

जादू तव मधाळ हास्याची|
दाटे उर्मी उरी चैतन्याची|
लाजून मोहरून जाण्याची|
भूल पडे तव लावण्याची|२|

सौंदर्याची तू सोनपाकळी|
गंध सुगंध तुझा दरवळी|
मन जडले राजस बाळी|
भ्रमर गुंते जैसा कमलदळी|३|

लागली मना ओढ अनिवार|
चिंब भिजाया मनही आतुर|
केशकलापी कस्तुरी कर्पूर
कांती तव कि चांदणचूर|४|

मना मोहवी तव सावळकांती|
अलगद मिठीत तू एकांती|
बहरास यावी अशीच प्रीती|
युगायुगाची आपुली नाती|५|

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
सांगली जिल्हा: सांगली.
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

बरसल्या श्रावणसरी
कळी कळी हसे रानी
बहरल्या दाही दिशा
रूप मोहरले वनी ||१||

रुक्ष असलेली सृष्टी
होते ताजी आनंदाने
श्रावणाच्या पावसात
सृष्टी भावते सौंदर्याने ||२||

बरसता श्रावणसरी
सृष्टी खुले वैभवाने
जणू नटली थटली
हिरव्या शालू शृंगाराने ||३||

गंध मातीचा पसरता
तन मन होते बेधुंद
धारांमुळे श्रावणाच्या
आसमंती दरवळतो सुगंध ||४||

काय वर्णू हा सोहळा
सुरू असता श्रावणोत्सव
सज्ज होतो निसर्गही
करी तोही निसर्गोत्सव ||५||

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावण सरी*

सरावलेल्या मातीतून
हिरवे कोंब आले फुलून
कातळावरही हिरवळीच्या
रंगावर रंग गेले भूलून

चमचमणारे पाणी आणिक
पानावर माणिक मोती
झुळझुळ वाहती झरे आणि
रानी काजव्याच्या ज्योती

सणासुदीचे रेलचेल संगे
माहेरवाशीणींचे आगमन
नटूनथटून तरूणाईचे
हिरव्या रानी पदार्पण

पक्वान्नाची रेलचेल असे
सुगंध घराघरातून सरे
प्राण्याप्रती कृतज्ञतेची
भावना मनामनात भरे

लावती मनाला वेड किती
रिमझिमणाऱ्या श्रावणसरी
मोहविणाऱ्या धारा आणिक
नभी पाखरे भिरभिर करी

*सविता धमगाये, नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

हर्ष उल्हासाचा आला श्रावण
आनंदाची करीत उधळण

अलगदपणे श्रावणसरी बरसली
इंद्रधनुच्या रंगात सृष्टी रंगली

श्रावणसरीने सृष्टीचे सौंदर्य खुलले
चराचरात चैतन्य स्फुरले

खेळ सुरू झाला ऊन-पावसाचा
सर्वत्र पसरला हिरवाईचा गालीचा

व्रत -वैकल्यांचा श्रावणमास
सण-उत्सवांचा आहे खास

श्रावणमास सुवासिनीचा थाट
झीम्मा फुगडीचा घालती घाट

*सौ.प्रांजली जोशी ,विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

सर सर सरी पाऊस पडतोय रे
रिमझिम रिमझिम नाद करतोय रे ।।

काळे काळे ढग गगनात आले
गडगड ढग वाजायला लागले
वीजांचा नाच सुरू झालाय रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।१।।

उनाड वारा सू सू वाहतोय पानात
टपटप गारा पडतात अंगणात
टपोर्‍या शुभ्र गारा वेचूया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।२ ।।

बिजलीचा चमचमाट देखणा दिसतो
मयूर तालात पिसारा छान फुलवतो
ढगांचा नाच आपण पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे ।।३।।

पाऊस रानाला ओलेचिंब करतो
धरणीला हिरवा शालू हो नेसवतो
सजलेली धरणी पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे ।।४ ।।

पत्र्यावरती टिपरीचा नाद गुंजतो
कौलावरती ताशांचा आवाज होतो
पावसाचा सुरेल नाद ऐकुया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे।।५ ।।

नील आसमंत काळ्या मेघांनी व्यापला
श्रावणसरींचा आनंद मना खूप जाहला
सार्‍यांची खुशी आपण पाहुया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे ।।६।।

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

धुंद हिरवळ
फुलांचा दरवळ
निसर्गाचा बहर
पडता श्रावणसरी

हवाहवासा गारवा
वातावरणातील थंडावा
वाटतो नवा नवा
पडता श्रावणसरी

पाण्याचा ओलावा
प्रेमाचा सुगावा
मनमुक्त जगावा
पडता श्रावणसरी

दरवळ मातीचा
बेधुंद प्रितीचा
साक्षीदार क्षणांचा
पडता श्रावणसरी

सणांचे आगमन
संस्कृतीचे दर्शन
नात्यांचे मिलन
पडता श्रावणसरी

मने धुंद
चराचर बेधुंद
प्रकटती आनंद
पडता श्रावणसरी

निसर्ग सान्निध्यात
छोटूशी सहल
सोडूनी महल
पडता श्रावणसरी

व्हावे चिंब चिंब
मन शरीराने
जगावे आनंदाने
पडता श्रावणसरी

गीत आनंदाचे
सर्वांच्या ओठी
निसर्गाशी गट्टी
पडता श्रावणसरी

*देशमुख शर्मिला शिवाजी, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

बरसती जलधारा
श्रावणात रिमझिम
हर्ष होई अंतरात
दृश्य पाहून स्वर्णिम

ऊन,पावसाचा खेळ
येई रंगत जोमात
सप्तरंगी इंद्रधनु
शोभे कमान नभात

लेणं हिरवं लेवून
वसुंधरा नटलेली
रिमझिम पावसात
तरू,वेली आनंदली

व्रत वैकल्याचा मास
वाटे पवित्र अंतरी
सृष्टी चैतन्य बहर
हर्ष अती चराचरी

ओसंडून ही वाहती
नदी,नाले आवेशात
मुले करती चंगळ
लपंडाव पावसात

सण,उत्सव अगाध
आनंदाची पखरण
शंकराशी पुजूनिया
बेलपत्री ही अर्पण

देई मनास गारवा
थंड झुळूक वा-याची
शहारते अंग अंग
धुंदी श्रावणसरीची

*श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे*
साईनगर,अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

घन घनमाला नभी दाटल्या
ओथंबून वरती
आसुसलेली ओढ लागूनी
थरथरली ही धरती..

सरसर सरसर सरी बरसल्या
अल्लड श्रावणसरी
हिरवे पिवळे कोंब कोवळे
उमलून ये भूवरी..

थुईथुई थुईथुई मयूर नाचे
फुलवूनी अंगपिसारा..
पाचूच्या रानात पसरला
मयुरपिसी हा नजारा..

ओला ओला गंध चाफ्याचा
दरवळला ओट्यावरी..
वेलीवर गुलाब फुलला
ताजा काट्यावरी..

श्रावणातल्या आठवणी
मनी साठवू चला रे
आनंदसरीत भिजुया
सणवार करूनी साजरे .

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

महिन्यामध्ये सार श्रावण
भक्ती सोहळा पावन…
पुन्हा सूचित होती मने
अनेक ग्रंथातील श्रवण…

निसर्गाचा साक्षात्कार
किती देतो तो उधार..
श्रावणसरी कोसळता
सौंदर्य पाहण्या होई अधीर

गुजगोष्टी सुरू पानापानात
तेज येई झाडाझाडात…
सुरू होई शेतकऱ्याची धांदल
मंजुळ गाणे सुर पक्ष्यात…

दवबिंदूचे पडते सडे
फुलांचा मधुचंद्र फुले..
साज सृष्टीचा साज मनाचा
निसर्गदर्शनाने पारणे फिटले

सारेगमपदनिसा सम सुरात
श्रावणसरीला येई उधाण…
आस्वाद तो नयनमुखाचा
मौनात होई अंतरी दर्शन

*सौ.सिंधू बनसोडे,इंदापूर,पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿
*श्रावणसरी*

बरसल्या एका मागून एक मृग सरी
भेगाळलेल्या भूमीची गेली बदलून रया सारी

घन गरजू लागले मेघ ही बरसू लागले
सरसर शिरवे कधी रुपेरी ऊन घेऊन अवतरले

असा हा आला श्रावण घेऊन रिमझिम श्रावण सरी
ओल्या मातीच्या कुशीत बीजे आली अंकुरुनी

तरारली रान-वन उपवर झाली धरती
हिरवा शालू लेवून आली लावण्याला भरती

पाहून धरतीचे हे अनोखे लावण्य सुंदर
भिरभिरणाऱ्या वाऱ्यासवे झुळझुळ गाऊ लागतील निर्झर

सप्तरंगातल्या इंद्रधनु ही खुलवून गेले आकाश
मनोमनी बहरून गेला सुखद प्रकाश

सण ऊत्सवांची झाली दाटी, लेकी आल्या माहेरी
भेटीगाठींचा हा सोहळा रंगून गेला घरोघरी

श्रावणातल्या या श्रावण सरींनी ओलाचिंब झाला निसर्ग
जणू भासे उतरला पहा धरेवरी स्वर्ग

*सौ.अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿☘️💦🇮🇳☘️💦➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles