‘राशी’तल्या स्मार्ट गुरुजीचा बेबनाव अंगलट येणार?

‘राशी’तल्या स्मार्ट गुरुजीचा बेबनाव अंगलट येणार?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नौटंकीबाज गुरूजीचा ‘असली’ चेहरा लवकरच उघड होणार

भंडारा: जिल्हा परिषद म्हणजे आपल्या सास-याचे घर आणि आपण सरकारचे जावई. याच तो-यात तब्बल १३ वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या या ‘राशी’तल्या गुरूजीने सामान्य नागरिकांना ‘डिजीटल’ नावाच्या अंथरूणात झोपवून अक्षरश: फसवणूक केल्याचे भंडाराकरांच्या निदर्शनास आले आहे. पैसा उकळण्यासाठी या पठ्ठ्याने आजतागायत नवनवीन शक्कल लढवत सामान्य गावक-यांची लुबाडणूक केली आहे. त्याचा ‘असली’ चेहरा समजायला लोकांना बरीच वर्ष लागली. नकली चेह-याचा आड आजवर किती ‘माया’ जमवली याचा हिशोब गावक-यांना मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकप्रियता ही सापशिडीच्या खेळाप्रमाणे असते. राजकारणही याला अपवाद नाही आणि या राजकारणाचा गुरु म्हणून ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकाकडे प्रामुख्याने बघितले जाते. इतिहासापासून आजपर्यंत अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे लोकप्रियता वाढणे आणि घसरणे हे काळसदृश्य असते. ‘असली – नकली’ या देवानंद साधनाच्या चित्रपटातील ‘लाख छुपावो छुप ना सकेगा राज तो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा’ या गीताप्रमाणे ‘राशीत’ खेळणाऱ्या स्मार्ट गुरुजीचा चेहरा एका काॕल मुळे जनतेला चांगलाच माहीत झाला आहे.

काही माणसे दैनंदिन जीवन खरेखुरे जगतात की, शालिनीतेचा मुखवटा चेहऱ्यावर लावून पाल्य आणि पालकांना फसवतात, हाच प्रश्न आता पडत आहे. आपली खरी ओळख होऊ नये, म्हणून सभ्यतेच्या बुरखा पांघरून उखळ पांढरे करण्यातच ते धन्यता मानतात किंबहुना आव आणतात. सर्व विधीनिषेध ढाब्यावर बसून ज्ञानाची फसवेगिरी करत हे लबाड बोलबच्चन महाभाग राशीच्या मोहात इतके गुरफटले असतात, की आपली संपूर्ण नीतिमत्ता कधी गमावली याची त्यांना तिळमात्र ही जाण नसते. खोटा मुखवटा लावून ते समाजात उथळ माथ्याने सहज वावरत असतात. मात्र ‘राशी’तील घबाड उघड झाल्यानंतर या महाभागाची अवस्था केवलवाणी झालेली असते. असाच असली नकली चेहरा लावून ‘राशी’त खेळणाऱ्या स्मार्ट नाटकबाज गुरुजीची घटना जिल्ह्यात चर्चेचा विषय बनत आहे.

शिक्षण क्षेत्रातील अधिकारी अजूनही मूग गिळून का गप्प आहे? शिक्षकांच्या संघटना अशांना पाठीशी घालत आहेत का? तसेच जनतेचे सेवक असलेले लोकप्रतिनिधी यांचाही वरदहस्त असावा असे एक ना अनेक प्रश्न गावकरी विचारत असून याबाबत सखोल चौकशी करून या गुरुजीवर कारवाई करावी जेणेकरून आमची होत असलेली लुबाडणूक थांबेल अशीही गावकरी मागणी करीत आहेत.

पैशाच्या लालचीतून खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेली धडपड तकलादू असते. याचे भान मात्र हा ‘स्मार्ट राशीयुक्त’ गुरुजी विसरला आहे. ना लाज ना शरम… ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपय्या…! या धुंदीत हे स्मार्ट गुरुजी वावरत आहेत. या अनुषंगाने प्रसिद्ध शायरी बशीर बद्र म्हणतात “शौरत की बुलंदी भी पलभर का तमाशा है, जिस डाल पे बैठे है हो वो टूट भी सकती है” खरे पाहता हे अशोभनीय असून शिक्षण क्षेत्र अशा नकली चेह-याने काळवटून गेले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles