
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पंधरा🌈🌈🌈*
*🥀विषय : श्रावणसरी*🥀
*🍂बुधवार : १० / ०८ /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या तसेच नवीन सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
पडता निर्मळ श्रावणसरी
तनमन प्रसन्न व्हावे
पिक बहरले जोमाने
निसर्गाचे रुप मनाला भावे
*विवेक पाटील*
*मालेगांव (नाशिक)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
ऊन पावसचा खेळ
येती सरी वर सरी
रस्त्यावर साचे जळ
पडतांना श्रावणसरी
*✍️श्री.बाळासाहेब रोहोकले*
मांडवे खुर्द,अहमदनगर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी..*
श्रावणसरी बरसल्या
ऊन पावसाचा खेळ
इंद्रधनुची चाहूल होता
निसर्गाचा अलौकिक मेळ..
*सौ.प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
अंगाला झोंबणारा गार वारा
धो धो कोसळणार्या श्रावणसरी,
धरती सारी न्हाऊन गेली
शहारे येई अंगावरी.
*दिनकर श्रीपती पाटील*
नाधवडे जि सिंधुदुर्ग
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
सणासुदीच्या दिवसांत
श्रावणसरी येतात जोमात
हिरवा शेत दिसे मनभावन
बळीराजा जातो सुखावून
*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
*श्रावणसरी कशा कोसळती*
*गड्या! वरचेवरी*॥
*हिरव्याकंच झाल्यात*
*नदी काठ अन डोंगरदरी*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
श्रावणसरींनी जलमय झाले
नदी नाले तलाव
न्हावून निघाली धरणीमाता
आता कर थोडा अटकाव.
*सौ. मनिषा आष्टनकर*
चिमूर, चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावण सरी*
*न्हाऊन निघे धरणी*
*बरसता श्रावण सरी,*
*आईचे मधुरच वर्णन*
*जणू मनोहर बासरी.*
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
बरसता श्रावणसरी
वसुंधरा चिंब न्हाली
अंकुरले बीज पोटीचे
चैतन्य आशादीप व्याली
*तारका रुखमोडे*
अर्जुनी जि गोंदिया
*©परीक्षक/संकलक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
पडता श्रावणसरी
येई मृत्तीकेला गंध
मेघ नभात दाटता
सरी वर्षतील धुंद
*प्रा. दिनकर झाडे, गडचांदुर*
जि. चंद्रपूर,
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
‘श्रावणसरी’ बरसू लागल्या
सुरू झाला ऊनपावसाचा खेळ
निसर्गाच्या छटा उमगल्या
होणाऱ्या बदलांशी जमला मेळ
*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
*सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
*अंबरनाथ जि. ठाणे*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
*रिमझिम पावसात*
*श्रावणसरी बरसे*
*वसुंधरेला भेटण्या*
*हिरवळ ही तरसे*
*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
*मधुर शीळ घालत येती*
*सरसर श्रावणसरी धरेवर मोती*
*मन मोरपिसारा सुंदर फुलती*
*हिरवेरान समृध्दी गीत गाती*
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
ढग आड आले सुर्या
किरणे पडेना भुवरी
तुझी जागा घेती आज
बेधुंद होऊनी श्रावणसरी
*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿💦💦🇮🇳💦💦➿➿➿
*श्रावणसरी*
श्रावण सरीचा हाच पाऊस
मनात जागवी सणांची आस
कधी ऊन रे कधी पाऊस
खऱ्या प्रेमाचा आत्मविश्वास
*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖