
500 राष्ट्रध्वज देण्याच्या उद्देश-श्रद्धा पाठक, हर घर तिरंगा, अभियानाला सुरुवात
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमीत्त मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे आवाहन केले. त्यानुसार दि. 9 ऑगस्ट 2022 ला क्रांतीदिवसाचे औचित्य साधून प.पु.मोहन भागवत यांना सौ.श्रद्धा पाठक यांनी राष्ट्रध्वज देउन अभियानाची सुरुवात केली. 10 ऑगस्टला शहीद शंकर महाले यांच्या सारख्या अग्रगण्य क्रांतिकारकांना स्मरून व त्या परिवाराला वासुदेवराव महाले व सौ.गीता महाले यांना दुसरा ध्वज देऊन पंतप्रधानांच्या अभियानाला सुरुवात केली.
500 राष्ट्रध्वज देण्याचे उद्दिष्ट ठेवून सौ.श्रद्धा पाठक या कार्यरत आहे. जे स्वखर्चाने राष्ट्र ध्वज घेऊ शकत नाही अशा गरजु परिवाराला पण राष्ट्रापती निष्ठावान परिवाराला सौ.श्रद्धा विजय पाठक राष्ट्रध्वज मोफत वितरीत करणार आहे. आजच्या “हर घर तिरंगा” या अभियानात अनील मानापुरे, आशिष भुते, भुषण देशपांडे, योगेश कठाळे, संजय वाठ, शैलजा कहु प्रामुख्याने उपस्थित होते.