श्री दिगंबर जैन युवक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

श्री दिगंबर जैन युवक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) व महिला शाखा आणि ग.भा.गंगाबाई लक्ष्मणराव श्रावणे एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त सहकार्याने दहावी व बारावी व उच्चशिक्षित पदवीधर विद्यार्थ्यांचे स्वागत व पारितोषिक वितरण कार्यक्रमश्री सैतवाल जैन संघटन मंडळ, ग्रेट नाग रोड, महावीर नगर, नागपूर येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उदघाटक विजय शहाकार (निवृत्त प्राचार्य गजानन हायस्कूल) कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोदबाबू श्रावणे (विश्वस्त ग.भा.गंगाबाई लक्ष्मणराव श्रावणे एज्युकेशन ट्रस्ट) मुख्य अतिथी विशाल जैन, संचालक ब्राईट कॉम्पुटर अकाडमी, मुख्य वक्ता अखिल कस्तुरकर (ऑपरेटर बँकिंग सोल्युशन्स) यांची प्रमुख उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संबोधित करतांना शहाकार सर म्हणाले की, कोरोनाच्या काळात शिक्षण पद्धतीत बरेच बदल झाले आहेत, त्यानुसार विद्यार्थीही ऑनलाइन पद्धतीने स्मार्ट झाले आहेत.

कस्तूरकर यांनी विद्यार्थांना जीवनात यशस्वी होण्याचे गुपित सांगितले. विशाल जैन व विनोद बाबू श्रावणे आणि महिला शाखेच्या अध्यक्षा प्रतिभाताई नखाते यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य साठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष विनय सावळकर म्हणाले की, शिक्षण हे एकमेव शस्त्र आहे ज्याद्वारे तुम्ही यशस्वी जीवनाच्या इच्छा पूर्ण करू शकता, त्यांनी संस्थेविषयी माहिती दिली. राज्यातील अव्वल विद्यार्थी उपस्थित प्रियाशा कापसे हिने आपल्या यशाची माहिती दिली व आपल्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबियांना दिले.

या कार्यक्रमात भागीदार संस्था श्री पार्श्व प्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर इतवारी, श्री सैतवाल जैन संघटन मंडळ महावीर नगर, जैन सहयोग ट्रस्ट, महावीर युथ क्लब इतवारी, अ.भा.पुलक जन चेतना मंच नागपूर, अखिल दिगंबर सैतवाळ संस्था, दिगंबर जैन महासमिती व सर्व संस्थांचे पदाधिकारी, मंदिर समितीचे विश्वस्त, प्रतिष्ठित समाजसेवक व विद्यार्थ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रमोद भागवतकर व माया ताई सावळकर यांनी करून दिला.

पारितोषिक वाचन नीता भुसारी, भारती उबाळे, संध्या काळे यांनी केले संचालन कार्यवाह प्रशांत भुसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन मीडिया प्रमुख राजेश जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री भुसारी, मनीषा सावळकर, स्मिता महात्मे, मृदुला जैन, अर्चना शहाकार, वैशाली मानेकर, मनीषा रोहणे, मीनल आगरकर व संस्थेचे पदाधिकारी धनराज गडेकर, अविनाश शहाकार विकास श्रावणे यांनी सहकार्य केले. संतोष दादा सावळकर, किशोर महात्मे, श्रीकांत धोपडे, यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles