नायरा पेट्रोल पंपच्या शौचालयावर मुख्यधिकारी यांची कृपादृष्टी

नायरा पेट्रोल पंपच्या शौचालयावर मुख्याधिकारी याची कृपादृष्टी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मलमूत्राचे दुष्परिणाम_

सतीश भालेराव,नागपूर

हिंगणा :- वानाडोंगरी नगर परिषदचे प्रभाग क्र १० मधील NAYARA पेट्रोल पंपचे शौचालयाचे मलमूत्र थेट पाईप लाईन द्वारे नाल्यामधून वेणा नदीच्या पात्रात मागील काही महिन्या पासून सोडल्या जात आहे. ही बाब नगर परिषद वानाडोंगरीच्या अनेकदा निदर्शनास आणून दिले असता त्यांची NAYARA पेट्रोल पंपवर कारवाई करण्याची इच्छा नसताना सुद्धा काही जागरूक नागरिक या बाबत विचारणा करीत असल्यामुळे नाईलाजास्तव दि. १८/०४/२२ पत्र क्र. ६६३/२०२२ नुसार स्वच्छता विभाग मार्फत शौचालयाचे पाणी वेणा नदीत सोडत असल्याबाबत नोटीस दिली. व शौचालयाचे पाणी नदीत सोडणे बंद करावे सदर नोटीस मिळाल्यापासून ७ (सात) दिवसाचे आत आपल्या शौचालयाच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अन्यथा आपणा विरुद्ध महाराष्ट्र नगर परिषद/ नगर पंचायत व औद्योगिक अधिनियम १९६५ चे प्रकरण १६ (२२९) कलमा नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या आशयाची नोटीस नगर परिषद वानाडोंगरी मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी विपुल गोधे नायरा पेट्रोल पंप यांना दिली असून आज नोटिसला चार महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा कोणाच्या दडपणामुळे कारवाई केली नसणार की या मध्ये काही आर्थिक घेवाण देवाण तर झाली असणार काय? या बाबत जागरूक नागरिक तर्क वीतर्क लावत आहे. या बाबत प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला असता आज रविवार आहेत याची त्यांना जाण असल्यामुळे या विषयावर बोलणे टाळले पाहिजे म्हणून त्यांनी या बाबत सोमवारी बोलूया म्हणाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles