
प्रियदर्शनी स्कूल महाजनवाडीत रंगला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- वानाडोंगरी प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कुल महाजनवाडीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने स्वतंत्र चा अमृत महोत्सव सोहळा पार पाडला. याप्रसंगी शाळेचे संचालक श्री. धर्मेंद्र कोहाड मुख्याध्यापिका सौ.विद्या हलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण श्री.मधुकरराव घोडमारे यांच्या हस्ते पार पडला तसेच चिमुकल्या नी देशभक्तीपर गीते सादर केली अभीभाषने देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि ऊंच आकाशात तिरंगी फुगे उडवून या अमृत महोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ.हलमारे यानी शाळेची माहिती सांगून आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.