शरदचंद्र नगर गाळेधारक सहकारी संस्थेत स्वातंत्र्य दिन साजरा

शरदचंद्र नगर गाळेधारक सहकारी संस्थेत स्वातंत्र्य दिन साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- शरदचंद्र नगर गाळेधारक सहकारी संस्था, म्हाडा काँलनी येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.या प्रसंगी निलडोह ग्रामपंचायत सदस्य शुभम दाभे, प्रविश भाबडा, कल्पना शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शरदचंद्र नगर गाळेधारक संस्थेच्या अध्यक्षा उषा शुक्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रीय ध्वजास सलामी देत उपस्थित सर्व समुहाने राष्ट्रगीत गाऊन ध्वजवंदन केले.

त्यानंतर संस्थेचे सचिव सुरेश बोरीकर यांनी परीसरातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थितांना मिठाई वितरीत करण्यात आली, संस्थेचे सहसचिव महेश वासनिक यांच्या संकल्पनेतून व संस्था कार्यकारणी सदस्यांच्या सहयोगाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्य गाळेधारक सोसायटी मैदानात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी संस्था कार्यकारणीचे सदस्य संदिप टालपेकर, लिलाधर दूबे, रामऊदार सींग, दिवाकर थोटे यांच्यासह गाळेधारक चंद्रकांत खडतकर, कवडू खडसे, राजू लहाने, रामभाऊ घडेकर, मंगेश अखंड, प्रकाश शहारे, अनिल घाटे, वसंता कांबळे, माया खडतकर, राजेंद्र नरुले, प्रशांत खडसे तथा बहुसंख्येने नागरिक या समारोहास उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles