महेंद्रशेठ दळवींचा निर्धार रायगड जि.प.वर भगवा फडकवणारच

महेंद्रशेठ दळवींचा निर्धार रायगड जि.प.वर भगवा फडकवणारच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सचिन पाटील (अलिबाग)

रायगड: रायगडमधील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून पक्षाची नव्याने बांधणी करण्यात येत असून रविवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागमध्ये झालेल्या रायगड जिल्ह्या कार्यकारिणीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने जाहिर केला आहे.

अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी राजा केणी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. राजा केणी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पक्षश्रेष्टींनी दिलेली जबाबदारी खूप मोठी आहे, ही जबाबदारी पेलण्यासाठी पक्षाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे. त्याचबरोबर रायगडमधील सर्वसामान्य जनता आपल्या बाजूने आहे. हे सिद्ध करण्याची संधी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाली आहे. यासाठी वेळ खूप कमी असल्याने आपल्याला पक्ष बांधणीसाठी दिवसरात्र मेहनत घेऊन काम करावे लागणार आहे.

आ. महेंद्र दळवी यांनीही पदाधिकाऱ्यांना एकवटून काम करण्याबद्दल मार्गदर्शन केले. आता आपले सरकार आलेले असल्याने विकासकामांना अधिक गती मिळणार आहे. राहिलेली कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याबरोबर नव्या विकासकामांना मंजूऱ्या मिळवण्याचेही काम केले जाईल. सामान्य मतदारांचा विश्वास आणि त्यांचे आर्शिवाद मिळवण्यासाठी आपण तळागाळातील मतदारांपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या कालात महाराष्ट्र राज्याचे मा.मुखमत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शना खाली रायगड जिल्ह्यात विकासाची अनेक कामे मार्गी लावून जिल्ह्या चा सर्वागीण विकास करणार तसेच युवा पिढीला रोजगार निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देणार पूर्णपणे उत्साही वातावरणात झालेल्या या बैठकीसाठी उपजिल्हाप्रमुख भरतशेठ बेलोसे, कामगार नेते दीपक रानवडे, मुरुड तालुका प्रमुख ऋषीकांत डोंगरीकर, मुरुड तालुका संघटक यशवंत पाटील, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, रोहा तालुका प्रमुख अॅड. मनोज शिंदे, मुरुड उपतालुका प्रमुख मनोज कमाने, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती संजय जांभळे, अॅड. सुशिल पाटील, महाराष्ट्र वाहतुक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश मोरे, अलिबाग तालुका संघटक नंदकुमार पाटील, निलेश घाटवळ, सुरेश म्हात्रे
आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles