अर्जुनीच्या ‘दि न्यू मून’ स्कूलमध्ये ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अर्जुनीच्या ‘दि न्यू मून’ स्कूलमध्ये ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया : इंग्रजांच्या अमानुष जुलमी सत्तेच्या बेडीतून आपली भारतमाता मुक्त झाली. यासाठी म. गांधी पं. जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लो. टिळक, भगतसिंग, राजगुरु, अशा क्रांतिकारकांच्या प्राणांच्या आहुतीतून स्वातंत्र्याची पहाट उगवली. अशा क्रांतिकारकांना स्मरण्यासाठी व तिरंगा डौलाने फडकवण्यासाठी दि १५/०८/२०२२ रोजी न्यू मून स्कूलच्या प्रांगणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष यशवंत परशुरामकर यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या धसोहळ्यास पालकवृंद व संस्थेचे अनेक विश्वस्त पदाधिकारी, शाळेचे समस्त अध्यापक, प्राध्यापक गण उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत पंचायत समितीद्वारे विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. त्यात सहभागी विद्यार्थ्यांपैकी मानांकन प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा याप्रसंगी आयोजित केला गेला. या सोहळ्यात चित्रकला स्पर्धेत अर्जुनी मोरच्या केंद्रातून प्रथम आलेला विद्यार्थी ज्ञानेश्वर कापगते याला संस्थाध्यक्ष परशुरामकर सर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, निबंधस्पर्धा यातील विजेत्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाळेतील अध्यापक श्री बांडे यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतनही याप्रसंगी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदायाच्या अन्वये तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली.

या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ज्यु. कॉलेजचे प्राचार्य सचिन मेश्राम प्रा. राकेश उंदिरवाडे, प्रा. तारका डोंगरवार, अध्यापिका लिना चचाणे, त्रिवेणी थेर, कुंजना बडवाईक, हिना लांजेवार, प्रतिक्षा राऊत, बांडे या सर्वांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन प्रा. तारका रुखमोडे यांनी करून आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles