
शेषराव गणवीर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिनी निघाली संविधान सन्मान रॅली.
नागपूर: स्वतंत्राच्या 75 व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी संविधान चौक ते दीक्षाभूमी येथे बाईक रॅलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले असून विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष शेषराव गणवीर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली यावेळी महाराष्ट्र राज्यांचे मीडिया प्रभारी भागवत लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान, सन्मान या रॅलीमध्ये सुमारे 50 कार्यकर्तासह महिला व पुरुषांचाही समावेश होता.
कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हार अर्पण करण्यात आले.
नंतर भागवत लांडगेनी आपले मत व्यक्त करून रॅलीचे महत्व विषद करून कार्यकर्त्यांना संबोधित केले. भारतीय संविधानाच्या कलम १ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, देशाचे नाव भारत (India ) असे राहील. मात्र देशातील केंद्र सरकारचे नेते नेहमीच हिंदुस्तान असे संबोधतात. खरं तर हा घटनेचा अपमानच म्हणावा लागेल. लांडगे नी पुढे सांगितले की, या देशात धर्माधर्मात तेढ निर्माण करण्यात येत आहे.
नागरिकांच्या समान हक्काची अनदेखी करण्यात येत आहे. संविधानात लिहिलेल्या कलमांचा जनकल्याणार्थ उपयोग करण्यात येत नाही. 130 कोटी जनतेला संविधानाची ओळख करून दिल्या जात नाही. अर्थात संविधानाची पायमल्ली होत आहे. म्हणून या रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आला आहे असे यावेळी म्हणाले. रॅलीचे समापन दीक्षाभूमीवर दुपारी 2 वाजता करण्यात आले.
याप्रसंगी रॅलीत अनिल गायकवाड, अशोक निमसरकर, भावना निमसरकर, सोनू निमसरकर, संध्या खोब्रागडे, भारती सरदारे, माया खोब्रागडे, सौरभ गणवीर, दिलेश मेश्राम, ईश्वर नितनवरे, कुंदा जांभुळकर, दीपाताई गायकवाड, आशाबाई मेश्राम, प्रशांत मेश्राम, आदरणीय मेश्राम इत्यादींनी रॅलीत भाग घेतला होता. आणि सुनीता गणवीर ह्या सुद्धा यामध्ये सहभागी होत्या.