‘राशी’तील गुर्जीची बातच न्यारी, गावनेत्यांच्या हाती दिल्या डिजिटल तुरी…!

‘राशी’तील गुर्जीची बातच न्यारी, गावनेत्यांच्या हाती दिल्या डिजिटल तुरी…!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा: महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात शिक्षणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिकलेला म्हणजे शिक्षित आणि शिक्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी करणारा म्हणजे सुशिक्षित हा अर्थ अनुभवाने फार अलीकडे समाजाच्या लक्षात आला आहे. फसवणूक, द्वेष, मत्सर, विखार यांचा बेमालूम वापर करणारा राशीतला ‘गुर्जी’ शिकलेला असेलही; मात्र त्याला सुशिक्षित म्हणण्याचे धाडस आता कोणी करणार नाही. ते यासाठी की सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या या ‘गुर्जी’ने मानवतेला लाजवणारे कामे केले आहे. गुर्जीस ‘मुबारक हो, सय्यद अली का वाली, मबारक हो’ म्हणणारे मागील तेरा वर्षापासून फसलेले पालक आता आपली रक्कम परत भेटावी या अपेक्षेने गुर्जीच्या नावे बोटं मोडत आहे.

“आणिले पैसे तुझे तू आणि दिले माझ्या करी,
का, किती, केंव्हा, कुणाचे सर्व तू विसरून जा,
ज्यास लेखी ना पुरावा, जे कोणी न पाहिले,
घेतले मोजून जे मी तेच तू विसरून जा”
एक विडंबनकाराच्या शब्दात ठेंगा दाखवून या राशीतल्या गुर्जीने डिजीटल स्मार्टच्या नावाखाली गडगंज माया जमवल्याची चर्चा सध्या सर्व शहरात सुरू आहे. अॕडमिशनच्या नावावर शेकडो खोवांचे बोल पाठीवर लादून हा गुर्जी गडगंज संपत्तीचा मालक झाला आहे. त्यामुळे स्मार्ट डिजीटल शाळेत मुलाला अॕडमिशन मिळावे, म्हणून पावती न घेता दिलेल्या ऐच्छिक देणगी नंतर मुलगा बोलका पोपट झाल्याने पालक हैराण झाले आहेत. त्यामुळे अॕडमिशनपोटी दिलेल्या ऐच्छिक देणगीने हाहाकार माजला असून, आजकाल “सारखा बाप गेला आणि बोंबलताना हात गेला” असे म्हणून स्वतःच्याच मनाला मुरड घालण्याची वेळ पालकांवर आली आहे.

‘मुबारक हो’.. गुर्जी आम्ही देणगी भरली पण पावती दिली नाही. आमचा पैसा कुठे खर्च केला याची साधी कुठेही नोंद नाही. यावर गुर्जी म्हणतात पैसे तर दोन शिक्षक सहकारी व शा व्य समितीच्या अध्यक्षांच्या नावाने तयार केलेल्या समितीने घेतले आहे. माझा यात संबध नाही. ‘दानपेटी’ नावाची संकल्पना यातूनच तयार झाली. परंतु शाळेतील या दानपेटीत दिवसभर जमा झालेली रक्कम सायंकाळी अचानक गायब व्हायची; आजतागायत गुर्जीने या दानपेटीची चाबी तर दाखवलीच नाही परंतु आपली आलीशान माडी बांधून त्यात लिफ्टसह सीसीटीव्ही कँमेरे जरूर लावले आहे. फसगत झालेला पालक वर्ग आता त्या चाबीचा शोध घेत असून, चाबीवाल्या नौंटकीबाज गुरूजीला प्रश्न विचारत आहेत.

गावक-यांची तसेच नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक केलेल्या गुर्जीच्या अंगलट हे प्रकरण येत असल्याने पूर्वी काही गावगुंड नेत्यांनी गुराजीकडून मलाई खालेल्ली असून ते गावनेते आता गुर्जीची पाठीराखण करण्यात पुढाकार घेत असून खालेल्या मिठाला जागण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे. ज्यांनी या विरोधात आवाज उठविण्याचा पूर्वी प्रयत्न केला अशा निवडक पालकांच्या मुलांना फुकट प्रवेश देऊन गपगार केल्याचे तेच पालक आता गुर्जीविरोधात बोंब मारतांना दिसून येत आहे. तर काही नाव न छापण्याच्या अटीवर या लुबाडणुकीच्या धंद्याबाबत उघडपणे बोलत आहे.

शाळेत अॕडमिशनसाठी पावतीविना देणगी व राज्यात पहिल्यांदाच शाळेत दानपेटी लावून राशी जमवणाऱ्या गुर्जींच्या कारनाम्याची आणि त्यावर मोर झालेल्या गावनेत्यांची आज-काल जिल्ह्याभरात चविष्ट चर्चा सुरू आहे. आता तो ‘गुर्जी’ खरंच शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून जमलेल्या राशीत कुणाकुणाला वाटेकरी करून घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, हे जनतेला चांगलंच अवगत झालेलं आहे. तेरा वर्षात खडू न पकडणा-या गुर्जीने ऐवढी माया कशी जमवली याबाबत लोकं आता बोलायला पुढे येत आहे.

पूर्वीच्या शाळेत असतांना रात्रभर नाटकात काम करून दिवसभर शाळेत झोपणा-या याच पठ्ठ्यांची गावक-यांनी बदली केली होती. नंतर कोणतेही गाव या गुर्जीस नको म्हणून बोलायचे पण राशीतल्या गावक-यांनी अंधविश्वास ठेवला हीच मोठी चूक तेरा वर्षापूर्वी घडली. नौंटकीबाज गुरूजीच्या अरेरावीने व मोठ्या तसेच चढ्या आवाजात अधिका-यांशी बोलण्याने प्रशासनातील अधिकारीही या त्रासाला कंटाळले असल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.

शिक्षित आणि सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या आपल्या समाजात काही शब्द इतके सहज रुढ होतात; की त्याचा मूळ अर्थ शोधण्याची नंतर कुणाला गरज वाटत नाही. अर्थ शोधणारे शोधतात. तोवर हे शब्द लोकांच्या तोंडी एवढे चपखल बसलेले असतात, की जिभेचे वळण सुटत नाही. प्राथमिकच्यापुढे सहसा जो शिकला त्याला सुशिक्षित म्हणण्याचा प्रघात कधीपासून सुरु झाला असावा याचा नेमका शोध लागत नसला तरी इंग्रजी राजवट गेल्यावर काही वर्षांनी हा शब्द उदयास आला असावा. ज्यांनी जुन्या काळात धर्मग्रंथ लिहिले, लोकांसाठी अन्याय आचारसंहिता निर्माण केल्या ते लोक पण सुशिक्षित असले पाहिजे याबद्दल कोणाच्या मनात संशय असण्याचे कारण नाही.

जो लिहितो, बोलतो, गातो तो केवळ शिक्षित कसा असेल त्याला सुशिक्षित म्हटले पाहिजे ना! पुढे सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि एकूणच शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी लढा दिल्यावर डॉ. आंबेडकरांनी घटनादत्त अधिकार प्रदान केल्यावर ज्ञान शाखात जाणाऱ्यांची संख्या एवढी वाढली की तिथून बाहेर पडल्यावर या सुशिक्षित लोकांनी सगळ्या महापुरुषांच्या स्वप्नांच्या चुराडा करण्याचा डिजीटलच्या नावाखाली मस्त कार्यक्रम राबवला. नवनवे फसवणुकीचे मार्ग याच वर्गाच्या सुपीक डोक्यातून निघाले. शेकडो वर्षापूर्वी ज्यांनी धर्मग्रंथ लिहून ठेवले, त्यातील आचारसंहिता कशा योग्य आहेत यासाठी हा वर्ग आपले तुटपुंजे ज्ञान खर्च करून जेव्हा ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ ठरली, तेव्हा त्यांचे पितळ उघडे पडायला सुरुवात झाली.

‘मुबारक हो’; म्हणणारे नागरिक आता या गुराजीच्या बडतर्फीची मागणी करीत असून आमच्या पुढील पुण्या बर्बाद होण्यापासून वाचवा असा टाहो फोडत आहे. शिक्षण क्षेत्रातील बडे अधिकारी यात सामिल असल्याचेही गावकरी नाव न सांगण्याच्या अटीवर संपर्क साधून माहिती देत आहेत. लुबाडणुकीच्या धंद्यापायी गावक-यांची आर्थिक स्थिती कोलमडली असून गुर्जीचा पैसे मागण्याचा सुरु असलेला तगादा त्वरीत बंद करून या गुर्जीवर ताबडतोब कारवाई करून बडतर्फ करावे अशी मागणी होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles