इंडियन ऑईलचा डिलर करतो रिक्षा चालकांचे मानवी शोषण

इंडियन ऑईलचा डिलर करतो रिक्षा चालकांचे मानवी शोषण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर -इंडियन ऑईल कॉर्पोरेशन डिलर ओम डोमॅस्टिक गॅस अॅन्ड अप्लायेसेन्स मोहम्मद रफी चौक, राणी दुर्गावती चौक, उत्तर नागपूर यांचे कडून आजाही मजूर मानवी सायकल रिक्षा चालवितात आणि ८ सिलेंडर भरून ३२० के.जी. चे वजन ओढून ४० कि.मी. पर्यंत ओढतात. हा भारतीय संविधानाच्या कलम २३ शोषण विरूध्द अधिकार अंतर्गत गुन्हा ठरतो. आपण सध्या आधुनिक जगात जगत आहोत. सर्वत्र ऑटो थ्री व्हिलर, फोर व्हिलर चे युग आहे. या ५ रिक्षा चालकांनी थ्री व्हिलर किंवा ई-रिक्षाची मागणी करून देखील डिलरने त्यांची मागणी पूर्ण केली नाही.

मानवाधिकाराअंतर्गत हे प्रकरण येत असून या ५ रिक्षा चालकांनी त्यांच्या मानवी शोषणाविरूध्द आवाज उठविला आहे. हे सर्व मजूर (रिक्षा चालक) वयाच्या ५०-५५ वर्षाचे आहेत. म्हातारपणाकडे वळणाऱ्या या रिक्षा चालकांना रिक्षा चालवितांना अतोनात यातना सहन कराव्या लागतात. जसे कच्चे रस्ते (पांधण रस्ते), रस्त्यावर अनेक खड्डे, चढाई आली तर एक-एक रिक्षाला अन्य ४ चालक धक्का देवून चढवितात. या मानवी त्रासामुळे रिक्षा चालकांच्या छातीत दुखणे, शरीर दुखाने कहरने आणि मानवी शरीर थकून निरूपयोगी होणे अशा प्रकारचे मानवी अत्याचार सुरू आहेत.

एवढ्यावरच हा डिलर थांबला नाही. तर त्याने या ५ ही रिक्षा चालकांनी हे काम सोडून दयावे हा उद्देश समोर ठेवून त्यांना दूर-दूर चे सिलेंडर देणे. रिक्षा चालकांनी ३०-४० कि.मी. जाऊन ग्राहकांच्या घरी सिलेंडर पोहोचविणे मात्र ग्राहकांकडून आताच थ्री व्हिलर / फोर व्हिलर वाला आला आणि सिलेंडर घेवून गेला अशी प्रतिक्रिया मिळणे याचाच या रिक्षा चालकांना त्रास देणे हा एकमेव उद्देश यातून दिसून येतो.

राजकुमार तुरकन मेश्राम (५५) १९८८ पासून काम करत आहेत. मात्र त्यांच्याकडे पुरावा नव्हता. त्यांचे जवळ १९९१ कस्टमर डायरीची ट्रेनिंग सर्टिफिकेट प्राप्त होताच त्यांचे जवळ पुरावा आल्याने त्याने ओम डोमेस्टिक चे मालक संजय बालाजी कळमकर, रा. मानेवाडा रोड, विरोधात आवाज उठविला. ड्रेस, हातमोजे, बरसाती, पायातील बुट-पंचरचे पैसे मिळणे सायकल रिक्षाचे रिपेरिंगचे मिळणे आणि नियमित काम मिळणे या संदभात त्यांनी कळमकर समोर कैफियत मांडली. मात्र कळमकर यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. मरता क्या न करता? कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे मेश्राम चुप राहिले. पण कळमकर यांचा मेश्राम सहित भास्कर पंजाबराव चौधरी ( ५८), रवी डोमाजी वासनिक ( ५७), दिवाकर भाऊराव थुल ( ४८), राजु संभाजी पेंदोर ( ५७ ) यांचेवरही मानवी अत्याचार होत असल्याने या सर्वांनी एकत्र येऊन आवाज बुलंद केला आणि कळमकर यांना कंपनी नियमानुसार काही वस्तूंची करावयास भाग पाडले. मात्र अजुनही कळमकरने या पाचही रिक्षा चालकांना त्रास देणे सुरूच ठेवले.

तरी पण मानवी अत्याचाराच्या प्रकरणात आम्ही नक्कीच हस्तक्षेप करू आणि रिक्षा चालकाच्या ई-रिक्षा किंवा थ्री व्हिलर ऑटो देण्याच्या संदर्भात नक्कीच बदल घडवून आणू.
स्वतंत्र भारताच्या संविधानातील कलम २३ वेठबिगारी, अपव्यापार यांना मनाई आहे. यांचे उल्लंघन हा कायद्यानुसार गुन्हा आहे असे डीलर म्हणाले. सार्वजनिक प्रयोजनासाठी सेवा करायला लावल्यास केवळ धर्म, वंश जात वा वर्ग यात कोणताही भेदभाव करणार नाही. मात्र कळमकर यांनी जात (अनुसूचीत जातीतील अधिकतम रिक्षा चालक असल्यामुळे त्यांना त्रास देण्याचे ठाणले आहे) कलम-४२ – कामाबाबत न्याय मानवीय परिस्थिती लक्षात घेऊनच काम करून घेणे. कलम-४३ – कामगारांना निर्वाह वेतन देणे आर्थिक सुसंघटन करून संवर्ध कामगारांना काम, निर्वाह भत्ता वेतन देणे जेणेकरून जीवमान याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देणे.

कलम-४३ क – कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम आस्थापना यांच्या व्यवस्थापन मध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी विविधनाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना करतील. यावरून कायदेशीर बाबींचा विचार करून रिक्षा चालकांच्या मानवाधिकाराचे हनन होता कामा नये याची काळजी कंपनी व्यवस्थापनेने घ्यावी आणि या आठही रिक्षा चालकांना नियमित कामावर घेऊन त्यांना ई-रिक्षा किंवा थ्री व्हिलर द्यावे. १५ दिवसात यावर तोडगा न काढल्यास कंपनी व डिलर विरोधात जन-आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी आणि डिलरची राहीन.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles