परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन सण साजरे करण्याची शिकवण

परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन सण साजरे करण्याची शिकवण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नवीन मराठी शाळेत उत्सवाचे प्रात्यक्षिक_

पुणे: (प्रतिनिधी) डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांना सणवार, परंपरा आणि त्यामाठीमागचे सखोल अर्थ उलगडून सांगणारा एक रंगतदार कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी ‘आपल्या सण उत्सवांच्या परंपरांना आधुनिकतेची जोड देवून त्यापाठीमागचे विज्ञान समजून घेतले तर सण साजरे करण्यातला आनंद द्विगुणीत होईल.’ असा संदेश दिला.
यावेळी नागपंचमी, नारळीपौर्णिमा व दहीहंडी हे सण विद्यार्थ्यांच्या सहभागाने अगदी रीतसर साग्रसंगीत साजरे करण्यात आले.
कार्यक्रमात सुरवातीला शिक्षिका मीनल कचरे यांनी नागपंचमीची माहिती सांगून नागाचे निसर्गातील पर्यावरणीय महत्त्व समजून सांगितले. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या छोट्या मुलींनी ‘वारुळाला जाऊ चला ‘ या गाण्यावर बहारदादर नृत्य केले.
शिक्षिका रुपाली सावंत यांनी नारळी पौर्णिमेची माहिती सांगताना कोळी समाजातील या सणाचे महत्वं व प्रथा आणि समुद्राशी कोळी बांधवाचे नाते सोदाहरण उलगडून सांगितले. त्यावर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नारळी पौर्णिमेचे खास सामुहिक कोळीनृत्य नृत्य सादर केले.

वर्गशिक्षिका अर्चना देव यांनी गोकुळाष्टमीची माहिती सांगताना कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचे रसभरीत वर्णन केले, ज्यात बालश्रोते रंगून गेले होते. त्यानंतर पुष्पा देशमाने यांनी दहीहंडीची प्रथा सांगताना त्यातील समूह शक्तीची ताकद व एकीचे बळ यांचे महत्व सांगितले. यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी धमाल “गोविंदा” नृत्य सादर करून कार्यक्रमात रंग भरले. बाल गोपाळांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. मनीषा कदम यांनी ‘श्रावण आला आला’ हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना लाह्यांचा प्रसाद वाटण्यात आला.
शाला समिती अध्यक्ष डॉक्टर प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालेल्या या वैविध्यपूर्ण संगीत नृत्यमय कार्यक्रमात विद्यार्थी व उपस्थित पालक रमून गेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री हजारे व रूपाली सावंत यांनी केले.तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी आयोजन सहाय्य केले. सोनाली मुंढे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles