
ऑरेंज सिटी म्युझीकल ग्रुपचा कामठीत कार्यक्रम संपन्न
गजानन ढाकुलकर
नागपूर : – स्वतंत्र भारताचा ७५ वा अमृत महोत्सव च्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०२२ ला ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी म्युझिकल ग्रुप नागपूर यांना विशेष निमंत्रित करून कामठी शहरात ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले. कामठीच्या फौजी अधिकारी यांचे कडून ऑरेंज सिटी म्युझिकल ग्रुप ची विशेष तारीफ करण्यात आली. व पुढे २६ जानेवारीला विशेष कार्यक्रम करन्या करीता आमंत्रित करण्यात आले. व तसेच गुजरात मध्ये ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी ला विशेष रूपात आमंत्रित करण्यात आले आहे , कैलाश मलिक यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले , नागपूर शहरातील काही विशेष कलाकार यामध्ये गायक धनराज राऊत, मयुरी निंबाडे, दीपक रामटेके, भोला, प्रकाश ईन सर्व वादक कलाकार यांनी सफलता पूर्व कार्यक्रम करून व प्रमुख उपस्थित स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या वेळेस फौजी अधिकारी खास करून उपस्थित होते. सर्व मान्यवर यांनी कलाकार यांना आशीर्वाद दिला , या नंतर सर्व कलाकार व मान्यवरांचे आभार ऑरेंज सिटी म्युझिकल ग्रुप चे डायरेक्टर विजय मधुमटके यांनी आभार मानले.