प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कुल येथे तान्हा पोळा साजरा
हिंगणा :- आज दि. २६-०८-२०२२ शुक्रवार रोजी प्रियदर्शनी स्कूल हिंगणाच्या प्रांगणात तान्हा पोळा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला या प्रसंगी शाळेचे संचालक श्री. धर्मेंद्र कोहाड आणि सौ.प्रिती कोहाड व रायपूर ग्रामपंचायत च्या उपसरपंचा . श्रीमती दिपालीताई कोहाड , सौ.अर्चना घाटुर्ले उपस्थित होत्या .
छोटे छोटे चिमुकले शेतकरी व महाराष्ट्रीयन वेशभूषेत तयार होवून आले व शिव गीतावर नृत्य कार्यक्रम सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना घाटुर्ले मॅडम यांनी तान्हा पोळा उत्साहाची माहिती सांगितली, विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम त्यांनी सादर केले आणि मा. सौ दिपाली कोहाड मॅडम यांच्या हस्ते योग्य वेश भुश्या व बैल सजावट असलेल्या मुलांना बक्षिस देण्यात आले.
सौ. प्रिती कोहाड यांनी छोट्या चिमुकल्यांना प्रोत्साहन पर बक्षिस देवून आनंद व्यक्त केला तसेच श्री. धर्मेंद्र कोहाड सरांनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले .आणि मुख्याध्यापिका मॅडमच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता झाली.