जे. एस. एम महाविद्यालयात युवा महोत्सवाची धूम

जे. एस. एम महाविद्यालयात युवा महोत्सवाची धूम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते उद्घाटन_

अलिबाग: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ प्राप्त व्हावे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे दरवर्षी जिल्हा व विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग येथे करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अभिषेक जावकर उपस्थित होते.

उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉ. सुनील पाटील व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक श्री. निलेश सावे, मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव निरीक्षक निरीक्षक व नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कल्याण विभाग संचालक श्री. अरुण पाटील, जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, सेक्रेटरी, श्री. गौरव पाटील उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील ह्यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य, महाविद्यालय विकास समिती सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्रचार्य डॉ. नीळकंठ शेरे, उपप्रचार्य डॉ. सोनाली पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सहसमन्वयक प्रा. बालाजी राजभोज विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ प्रतिनिधी, परीक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अॅड. गौतम पाटील यांनी केले. सौ. प्रार्थना बेहेरे यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पदवी घ्यावी त्याबरोबरच आपल्यातील कलागुण जोपासावे व आपल्या आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडवावे असे सांगितले. पाश्चात्य गीतगायन या स्पर्धा प्रकारातील गाण्याच्या कार्यक्रमास सौ. प्रार्थना बेहेरे यांनी उपस्थिती लावून कु. स्वालीहा गोंडेकर या विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले. श्री. अभिषेक जावकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई विद्यापीठाच्या हा युवा महोत्सव गेले ५५ वर्षे सातत्याने चालू असून देशातील कोणत्याही विद्यापीठापेक्षा सर्वात मोठा युवा महोत्सव असल्याचे श्री. निलेश सावे यांनी आपल्या भाषणातून नमूद केले. जे. एस. एम. कॉलेजने नेहमीच युवा महोत्सव व इतर विद्यापीठस्तरीय कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे हे नमूद करून हा युवा महोत्सव सुद्धा यशस्वी होईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अनिल पाटील यांनी केले. प्रा.नीलम म्हात्रे यांनी कार्यक्रामाचे सूत्रसंचालन केले.

युवा महोत्सवाचे हे ५५ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण होते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यातील एकूण २५ महाविद्यालयांतील ४८३ विद्यार्थ्यानी संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला व साहित्य या मुख्य प्रकारांतील विविध ३२ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सव हे एक भव्य व्यासपीठ आहे.

युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, प्रा.आशुतोष मेहेंदळे व विविध विषयांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles