समुद्रपूर पंचायत समिती कार्यालयात कर्मचा-यांचा आ.बंब यांचा जाहीर निषेध

समुद्रपूर पंचायत समिती कार्यालयात कर्मचा-यांचा आ.बंब यांचा जाहीर निषेध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिक्षक, ग्रामसेवकांनी केला आ.प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध_

वर्धा: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संबंधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून विधिमंडळात शिक्षकांचा, ग्रामसेवकांचा अपमान व बदनामी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अजय गावंडे यांच्या नेतृत्वात दि.25 ऑगस्टला पं.स.समुद्रपूर कार्यालयाच्या परिसरात एकत्र येत जाहीर निषेध करण्यात आला.

निषेधाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार समुद्रपूर यांच्या मार्फतीने तर ग्रामविकास मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना मा. गटविकास अधिकारी समुद्रपूर यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले. शिक्षक मुख्यालयी राहत नाही म्हणून राज्यातील प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था झाली आहे. ग्रामसेवक गावखेड्यात राहत नसल्यामुळे ग्रामीण विकास रखडला. अशा प्रकारचे वक्तव्य करतानाच अर्थहीन आणि अतार्किक मुद्दे मांडून शिक्षक, ग्रामसेवकांच्या विरोधात अपमानजनक भाषणबाजी करीत वेतन थांबवण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत दि.23ऑगस्टला केली होती.

आ.बंब यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होताच शिक्षक, ग्रामसेवक कर्मचा-यांत संतापाची लाट उसळली. समाज माध्यमावर सुद्धा शिक्षक, ग्रामसेवक यांनी संताप व्यक्त करुन निषेध व्यक्त केला. निषेध निवेदनात ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा,समाज व्यवस्था केवळ तिथे काम करणारे शिक्षक, ग्रामसेवक कर्मचारी यांच्यामुळे टिकून आहे.याउलट शिक्षण व समाजाची दुरावस्था करण्याचे प्रयत्न तर अशक्त शासकीय धोरण करीत आहे.पुरेशा साधनसामग्रीचा अभाव,मनुष्यबळाची कमतरता याकडे मात्र आ.बंब यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसते. जनतेच्या पैशावर आमदारकीच्या सुविधा उपभोगत असतांना तळागाळात काम करणारे शिक्षक, ग्रामसेवक यांच्या बाबतीतच आ.बंब यांचा आसुड का ? असा प्रश्न उपस्थित करीत वेतन व घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यासाठी वित्त विभागाचा दि.07/10/2016 चा शासन निर्णय आणी रिट याचिका क्र.5822/2014 प्रकरणी मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आ.बंब यांना वाचण्यास आणि समजून घेण्यास शासनकर्त्यांनी उपलब्ध करुन द्यावा.जेणेकरून आततायी,बिनबुडाचे विधान आणि तथ्यहीन मागणी करने चुकीचे आहे असे आ.बंब यांना कळेल.अशा संतप्त भावना निवेदनात व्यक्त करण्यात आल्यात.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना विवेकी विचाराने विधान करने तसेच राज्याच्या कायदेमंडळात भाषण करतांना तळागाळात काम करणारे कर्मचारी यांचा अपमान व बदनामी होणार नाही याची आमदार महोदयांना समज द्यावी अशीही मागणी मा.मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
निषेध सभेत प्राथ.शिक्षक संघाचे प्रेम भोजनकर,विशाल केदार,गोविंद अवगान,दिलिप झाडे,समिर वाघमारे, कृष्णा तिमासे, प्रमोद शिंदेकर ,शरद वाघमारे,संजय भोयर,विठ्ठल साटकर, सचिन सहारे,प्रकाश नगराळे,सुनिल खोडके,पद्माकर भुरे,गणेश पराते, सुनिल दडमल,अर्जुन पिपरधारे, कपिल खेकारे,हरिश्चंद्र नन्नावरे,विनोद साव.ग्रामसेवक संघटनेचे नरेंद्र जामुनकर,अघाऊ,धोटे,झामरे,सिडाम यांचेसह बहुसंख्य शिक्षक,ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles