HTKBS क्लब हिंगणा तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- शहरात आज दि. २९/०८/२०२२ रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्य सकाळी आंतर क्लब दौड स्पर्धा , हिंगणा बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन घेण्यात आली. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मालार्पण करून सर्वांनी प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.
तसेच क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद हॉकीचे जादुगर यांच्या बद्दल खेळाडू ना माहिती देण्यात आली. तसेच क्रीडा दिनाचे महत्व सांगण्यात आले .या प्रसंगी HTKBS क्लब चे मुख्य सल्लागार व मुख्य प्रशिक्षक श्री.राजेश भुते सर,श्री.गणेश सहारे ,अशोक कुंभरे ,मनोज पुडके , मुकुल बिल्लोरे, रजत भोकरे,सागर कैकाडे, यावेळी उपस्थित होते.