गणेश स्थापनेचा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ‘साडेसहा ते साडे नऊ’; पं. वसंत गाडगीळ

गणेश स्थापनेचा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ‘साडेसहा ते साडे नऊ’; पं. वसंत गाडगीळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: दि.31 ऑगस्ट,बुधवार रोजी यंदाचा गणेशोत्सव सुरू होत असून घरगुती गणपती बसवण्यासाठी पुण्याचे ज्येष्ठ विद्वान पुरोहित पं. वसंतराव गाडगीळ यांनी सर्व गणेशभक्तांना याबाबत खास मार्गदर्शन केले आहे. घरच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सकाळी ६.३० ते ९.३० हा सर्वोत्तम मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मंडळांचे सार्वजनिक गणपती १.३० च्या आत स्थापित झाल्यास उत्तम अशी पंडितजींची सूचना आहे.

घरच्या गणपतीची पार्थिव गणेश मूर्ती आधल्या दिवशीच आणून ठेवावी आणि ब्राह्म मुहूर्तावर दिवाळी पहाटसारखे सुस्नात होऊन विधीवत पूजा करून प्रसन्न मनाने गणेश स्थापना करावी, असे सांगून पुढे गाडगीळ गुरूजी म्हणाले की, ११ ते १ या माध्याह्नकाळातच दुपारच्या जेवणाचा नैवेद्य करावा आणि सायं आरती संध्याकाळी तिन्ही सांजेला सूर्यास्ताच्या वेळी करणे योग्य. ज्यांचा गणपती अर्धा दिवस किंवा दीड दिवस असतो, त्यांनीही याच नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. पं. गाडगीळ यांनी गणेश स्थापनेची विधीवत सांगितलेली पूजा u tub वर उपलब्ध आहे.

आबासाहेब मुजुमदार यांच्या वाड्यावरचा शाही गणपती पुणे शहरात प्रसिद्ध असून त्यांच्याकडचा गणपती प्रतिपदेलाच बसतो. मुजुमदारांच्या गणेश स्थापनेचे पौराहित्य पं. वसंतराव गाडगीळ वयाच्या दहाव्या वर्षापासून आजतातगायत करीत आहेत. त्याचप्रमाणे महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण दगडूशेठ गणपती मंडपात ऋषीपंचमीला करण्याची प्रथा सुरू करण्यात पंडतजींचा पुढाकार असून यंदा पुण्यातल्या ३१,००० महिला सहभागी होणार आहेत, अशी माहिती पं. गाडगीळ यांनी दिली. इतक्या मोठ्या संख्येने महिला सहभागी होण्याचा यंदाचा हा एक विक्रम असेल.

ऋषी पचमीला पं. गाडगीळ यांच्या शारदापीठम् या संस्थेच्या वतीने शहरातील ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी विश्वभवन, सिम्बाॅयसिस, सेनापती बापट रस्ता येते सकाळी ११वाजता हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

गणेश स्थापनेबाबत आणखीही काही गुरूजींशी संवाद साधला असता, त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळी६.३० ते ९.३० हा सर्वोत्तम मुहूर्त साधता आला नही तर ११ ते १.३० या वेळात गणेश स्थापना व्हायलाच हवी. कारण यंदा गणेश चतुर्थी ही 30 ऑगस्ट मंगळवारी दुपारीच सुरू होत असून बुधवारी ३ वाजेपर्यंत संपते. मात्र दुपारी १.३० नंतर राहू काल सुरू होत असल्याने गणपती स्थापना दुपारी दीडच्या आत होणे आवश्यक.

*दाते प॔चांग मुहूर्त*

दाते पंचांगकर्ते यांच्या म्हणण्यानुसार “श्रीगणेशाची मूर्ति घरी आणण्यासाठी मुहूर्त म्हणजे ग्रहणमोक्ष दिवस पाहण्याची आवश्यकता नसते. गणेश
स्थापनेसाठी यंदा प्रातः काल पासून मध्यान्हापर्यंत म्हणजे साधारण अंदाजे दु. १:३० पर्यंत कोणत्याही वेळी स्थापना केली तरी चालेल. ”

भाद्रपद शु. चतुर्थीचे दिवशी श्री गणेश स्थापना व पूजन करून घरी व सार्वजनिक गणेशमंडळात विधीवत पूजेची प्रथा पाळणे व मंगलमूर्तीचे पावित्र्य जपून परंपरेनुसार उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे सर्वच पुरोहीत व गुरूजींचे सर्व गणेशभक्तांना सांगणे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles