
अहमदनगर येथे माऊली संकुलात ‘सोनजाताक’ आत्मकथेच्या 14 भागांचे प्रकाशन
अहमदनगर: प्रबोधन फाउंडेशन अहमदनगर व नेहा प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दिनांक 05/10/2022 ला अहमदनगर येथील माऊली संकुल येथे सोनजाताक या आत्मकथेच्या 14 भागांचे प्रकाशन व प्रबुद्ध नायक साहित्य सन्मान पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जवाहर मुथा हे होते. आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी मैत्रेय बुद्ध या विषयावरती विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
नागपूरच्या प्रसिद्ध कवयित्री गीतकार लेखिका अभिनेत्री निर्मात्या व डिस्ट्रीब्यूटर प्राजक्ता खांडेकर यांचाही सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आचार्य रतनलाल सोनाग्रा यांच्या महामानव या पुस्तकावर आधारित चित्रपट लवकरच प्राजक्ता खांडेकर यांच्या द्वारा निर्माण करण्यात येईल अशी घोषणा आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी केली.
याप्रसंगी आचार्य रतनलाल सोनाग्रा प्रा. जवाहर मुथा जयंतजी येलुलकर, रावसाहेब कसबे,सुनील गोसावी,स्नेहसुधा कुलकर्णी सुभाष सोनवणे,विलास राशिनकर,वसंत विटणकर प्रेमसुख सोनाग्रा,लक्ष्मण हर्दवानी,सुलक्षणा धर,स्वाती सामल, प्राजक्ता खांडेकर शाहीर अरुण आहेर व आदी मान्यवर उपस्थित होते.