जोतिर्लिंग नवरात्र महोत्सव मंडळ , वाढेगांवच्या वतीने गीतगायन स्पर्धा संपन्न

जोतिर्लिंग नवरात्र महोत्सव मंडळ , वाढेगांवच्या वतीने गीतगायन स्पर्धा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

किशोर बन्सोड, प्रतिनिधी

सोलापूर: जोतिर्लिंग नवरात्र महोत्सव मंडळ मायाक्का देवी चौक वाढेगांव , तालुका – सांगोला , जिल्हा – सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेमध्ये उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला , न्यू इंग्लिश स्कूल सांगोला , कडलास हायस्कूल कडलास , सावे हायस्कूल सावे , सिद्धेश्वर विद्यालय माचनूर , जिल्हा परिषद प्राथ शाळा वाढेगांव , सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला , या शाळांमधून ४८ विद्यार्थी / विद्यार्थीनींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचे परिक्षक म्हणून मा. कैलास क्षीरसागर सर , मा. सहदेव ऐवळे सर , यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संतोष रायबान सर होते , तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ, राणीताई चव्हाण टायगर ग्रुप सांगोला तालुका प्रमुख , कोविड योद्धा सन्मानित मा खंडू भोसले पत्रकार , मा. समाधान मोरे पत्रकार , बर्गे सर , गावडे सर , सौ लवटे मॅडम , गिरीष गायकवाड , मधुकर भंडगे ( इंजिनीयर ) शिवाजी गेजगे सर , अर्जुन ईमडे , या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली . नवरात्र महोत्सव मंडळ महादेव गल्ली वाढेगांव , या मंडळाचे निष्ठावंत कार्यकर्ते मा. रवी कुंभार , तसेच शिवछत्रपती नवरात्र महोत्सव मंडळ शिवाजी चौक वाढेगांव अध्यक्ष मा. सौदागर दिघे , यांनी उपस्थित दर्शविली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. दत्तात्रय जावीर यांनी केले , तर सूत्रसंचालन मा. अनिल केंगार यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. पोपट गेजगे , विजय ऐवळे ( साईराम टेलर्स ), अध्यक्ष मा. सागर ऐवळे , उपाध्यक्ष मा. अजय गेजगे , सचिव मा. विकास ऐवळे , सहसचिव मा. आण्णासो ऐवळे , दत्तात्रय जावीर , सिताराम ऐवळे , वैभव ऐवळे , बालाजी जावीर , बालाजी ऐवळे , आणि मंडळातील सभासद कार्यकर्ते यांनी केले.

या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस – ट्रॉफी, प्रमाणपत्र ३३३३ रुपये (सौजन्य – मा. हणमंत चौगुले सर ) उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला यांनी पटकावविले. द्वितीय बक्षीस – ट्रॉफी, प्रमाणपत्र २२२२ रुपये (सौजन्य – मा. सिद्धेश्वर गेजगे , S G Creation , मा. अनिल केंगार ) हे विभागून न्यू इंग्लिश स्कूल सांगोला कुमारी, प्रिया ज्ञानेश्वर केंगार , सिद्धेश्वर विद्यालय माचनूर तन्वी तुकाराम ठेंगील ता, मंगळवेढा , या दोन्ही स्पर्धकांना देण्यात आले, तृतीय बक्षीस – ट्रॉफी प्रमाणपत्र ११११ रुपये (सौजन्य – मा. सुरेश पाटील , भावड्या ) संध्या नागणे कडलास हायस्कूल कडलास यांनी पटकावले , चौथे बक्षीस – प्रमाणपत्र ७७७ रुपये ( सौजन्य – जोतिर्लिंग नवरात्र महोत्सव मंडळ वाढेगांव )कुमारी सानिका इमडे सावे हायस्कूल सावे , यांनी पटकावले, पाचवे बक्षीस – प्रमाणपत्र ५५५ रुपये ( सौजन्य – मा . राम ऐवळे सर )कुमारी प्रतीक्षा कैलास हातेकर कडलास हायस्कूल कडलास यांनी पटकावले.ट्रॉफी , प्रमाणपत्र ( मा. बालाजी ऐवळे , सायली कॉम्प्युटर्स ) सर्व सहभागी स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे जोतिर्लिंग नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles