
दांडिया एव्हरग्रीन महाराष्ट्र; समाज प्रबोधनाचा आगळा वेगळा गरबा उत्सव
किशोर बनसोड, गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया : जिल्ह्यात दुर्गा पूजेला विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. आराधना करण्याची एक वेगळी पद्धत असते. अगदी परंपरागत रीतीने चालत आलेली पद्धत जे नऊ दिवस नवरात्र गरबा खेळणे. त्यातून देवीला आळवले जाते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येक चौकात गरबा खेळला जातो.
युवा पर्व सुपर वूमन , बिग बास्केट द्वारा आयोजित श्री समर्थ न्यू एज्युकेशन सोसायटी व सशक्त नारी संघटनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या गरबा उत्सवाने गोंदिया जिल्ह्यातील देवीच्या भक्तांना मंत्रमुग्ध केले आहे.
पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन रास गरबाचे आयोजन केले गेले. पहिल्या दिवशी पारंपारिक ‘गुजराती वेशभूषे’ने गरबाची सुरवात झाली. दुसऱ्या दिवशी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ ही संकल्पना घेऊन गरबाचे आयोजन करण्यात आले.
खऱ्या अर्थाने बेटी हीच घराची वारस कशी आहे कशा पद्धतीने वाढवते ह्या साऱ्या गोष्टी या गरबामधून दाखवण्यात आल्या. कारण जो समाज मुलींची कदर करत नाही; त्या समाजाला विनाशापासून कोणी थांबवू शकत नाही असा संदेश या गरबातून देण्यात आला. तिसऱ्या दिवशी “आओ पेड लगाये हम क्यू कि सासे हो रही कम ” असा संदेश घेऊन गरबाचे आयोजन करण्यात आलं. वृक्ष रोपणाचे महत्व, वृक्ष संवर्धनाचे महत्व, आणि कोरोना काळात ऑक्सिजन अभावी माणसांचे गुदमरलेले या गरबातून समाजासमोर दर्शविण्यात आले.
वृक्ष जरी फळ देणारे नसेल तरी ते सावली बरोबर हवेमध्ये प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन घालत असते आणि म्हणून वृक्षांना पर्यावरणाची चाळणी असे संबोधले जाते. चौथ्या दिवशी महाराष्ट्रीयन वेशभूषा करून शिवरायांचा जिजाऊंचा आणि सावित्रींचा जागर केला गेला. पाचव्या दिवशी बंगाली वेशभूषा परिधान करून बंगालमध्ये जे काली पूजेला विशेष महत्त्व असते त्याची महती समाजा समोर गरबातून मांडण्यात आली. केवळ धार्मिक वलयातून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात गरबांचे आयोजन केले जात होते. पण समाजातील सामाजिक समस्यावर भाष्य करून तशाच प्रकारचे संदेश देण्याचे काम या गरबातून युवा पर्व सुपर वुमन, बिग बास्केट, सशक्त नारी संघटन यांच्या वतीने केले गेले. त्यांच्या या अनोख्या आयोजनाबद्दल सर्व दूर त्यांचं कौतुक केले जात आहे.
सुपर वूमन च्या संचालिका प्राची गुडधे आणि बिग बास्केट गोंदियाचे संचालक प्रमोद गुडधे या दाम्पत्यांनी एक वेगळा प्रकारचा पायंडा गरबाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह आहे.