कर्करोग जागृती आणि उपचार कार्यक्रमाचे आयोजन

कर्करोग जागृती आणि उपचार कार्यक्रमाचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महिलांसाठी आरोग्य शिबीर_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: सामाजिक भावनेतून कॅन्सरवर उपचार करणारी डोणजे येथील ‘आपलं घर’ ही संस्था आणि आर.एस.बी. फाऊंडेशन यांचा सामाजिक विभाग यांनी संयुक्तपणे “कर्करोग जागृती आणि उपचार कार्यक्रम” अंतर्गत मोफत स्तन कर्करोग जागृती अभियान शिबीराचे आयोजन नुकतेच नवयुग महिला मंडळाच्या सदस्यांसाठी करण्यात आले होते. शिबीरातील चर्चासत्रास तज्ञ डाॅक्टरांनी मार्गदर्शन केले. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे लवकर लक्षात आली तर त्यावर वेळीच उपचार करता येतात आणि योग्यवेळी उपचार झाल्यास कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर सुध्दा मात करता येते, असा विश्वास निर्माण करून माहिलांमध्ये या आजाराबद्दल जागृती करण्याचा उद्देश आयोजक संस्थांनी स्पष्ट केला.

आयोजित शिबिरात एकूण ४२ महिला सहभागी झाल्या होत्या. सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्या बरोबरच त्यांना स्वआरोग्य तपासणीचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे, शिबीरात सहभागी झालेल्या या सदस्यांपैकी कुणालाही जर दुर्दैवाने कर्करोगाचे निदान झाले तर त्या महिलेच्या संपूर्ण मोफत उपचाराची जबादारी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. सदर शिबीर आयोजनास नवयुग महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. शैला पवार व इतर सदस्यांनी सहकार्य केले. शिबीर समन्वयक म्हणून राहुल बोराटे याने काम पाहिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles