किलबिल हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

किलबिल हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: गोखलेनगर जनवाडी परिसरातील गोर- गरीब व वंचितांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या किलबिल हायस्कूलमध्ये माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून प्रसिध्द असलेले डाॅ. ऐ पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना पुस्तकाची गोडी लागावी म्हणून पुणे शहर वुत्तपत्र विक्रेता संघाने या कार्यक्रमाचे आयोजन दै सकाळच्या सहकार्याने केले.
प्राचार्य रफीक सौदागर यांनी मान्यवरांचे स्वागत करून किलबिल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रेरणा दिनाच्या निमात्ताने विशेष उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमास डेक्कन वुत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री. राहुल चिंचकर यांनी किलबिल हायस्कूलमध्ये प्रेरणादिन आयोजन करण्याचे औचित्य सांगितले. ते म्हणाले, काही वर्षापूर्वी डाॅ.ऐ पी जे अब्दुल कलाम यांनी पुण्याच्या एका भेटीत त्यांच्या नेहमीच्या शैलीत शालेय विद्यार्थ्यांनी संवाद करण्याची ईच्छा प्रकट केली होती. त्यावेळी गरीब वस्तीतील “किलबिल हायस्कूल” च्या विद्यार्थ्यांना विशेषत्वाने निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळची ही घटना लक्षात घेऊन डाॅ. अब्दुल कलाम यांचे हे संस्मरणीय ॠणानुबंध जपण्यासाठी किलबिल शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करायचे ठरवले.”
कार्यक्रमास पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता श्री. योगेश बाचल, श्री. महेश कुंभार, दै.सकाळचे श्री. जगताप उपस्थित होते.
किलबिल हायस्कूलचे विद्यार्थी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी सकाळ समुहाच्या वतीने, सकाळचा शिक्षण
विषयक पाक्षिक अंक ( NIE ) सर्व विद्यार्थ्यांना भेट देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles