निवासी संकुलास दीपावलीनिमित्त भेट

निवासी संकुलास दीपावलीनिमित्त भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक,पुणे

पुणे: माझे कुटुंब, माझे पती वैभव माझी नात सोनाक्षी, आम्ही सर्वजण मानव सेवा प्रतिष्ठान,निवासी संकुल ता.पाथर्डी ,जिल्हा नगर या ठिकाणी नुकतीच भेट दिली. या संकुलाचे संस्थापक आहेत सुनील मतकरी. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात अनेक मनुष्यहानी झाली .यामध्ये ज्या मुलांचे आई आणि वडील दोघेही कोरोनाने गेले .त्या मुलांचा सांभाळ त्यांचे शिक्षण या निवासी संकुलामध्ये केले जाते. तर या संकुलाला मी आषाढी एकादशीला सुद्धा भेट देऊन आले होते ,आणि काल दिवाळीनिमित्त या मुलांना भेट देऊन आले .तेथे २५ मुलं निवासी आहेत या मुलांना नवीन ड्रेस घेतले तसेच दिवाळीनिमित्त फराळाचे बॉक्स मुलांना वाटण्यात आले .मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप आनंद झाला. त्याच बरोबर या मुलांच्या मध्ये रममाण झालो. मुलांनी आमच्यासाठी छान गीत गायन केले .त्याचबरोबर त्यांच्यातील विविध ऍक्टिव्हिटी असणारे विविध पैलू आमच्यासमोर उलगडले .अध्यक्षिय भाषणामध्ये मी त्यांना थोडेसे मार्गदर्शन केले. दिवाळीमध्ये आपण फटाके का वाजवू नयेत ,त्याचबरोबर दिवाळ सण साजरा कसा करावा? त्या दिनाचे महत्त्व काय? याचे त्यांना थोडक्यात मार्गदर्शन करून अध्यक्षिय भाषण संपवले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक रहिवासी,तेथील शिक्षक हजर होते.
मा.श्री.सुनिल मतकरींनी आमचे उत्तम आदरातिथ्य केले.
मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद
डोळे भरून पाहिला
जीव या सान मुलांमधेच
खरे तर खूप खूप रमला…..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles