तीन सवाल- एक जवाब!
*_हे थांबवचो कसो_*?
निरंजन मार्कंडेयवार
(महाराज दरबारात बसून नव्या कुठल्या वृत्तवाहिन्यांवर प्रेमाचा वर्षाव करता येईल, या विचारात. तोच त्यांचा लाडका विदूषक बारक्या प्रधान प्रवेशतो.)
*बारक्या प्रधान* : महाराज की जय हो! महाराज का वीरू हो!
*महाराज* : जय? वीरू? आरं बारक्या! तुंन आमच्या दिलातले शोलेच वयखले!
*बारक्या प्रधान* : मायं कामच हाय ते!महाराज, तुमी लोडमंदी दिसून रायले जी! तुमचा लोड हलक्या झाल्या पायजे. का सवाल का सतावते तुमास्नी?
*महाराज* :तीन सवाल आमचं डोस्क भंजन भंजन करीत हाय! आमाले आता तुरंत एकच जवाब पायजे!
*बारक्या प्रधान* : काहायले लोड घेता महाराज! का हो तुमचे तीन सवाल!
*महाराज* :सवाल नंबर येक. थो पायी चालून रायलय हाय… काऊन?
सवाल नंबर दोन. आम्ही थ्याच्या बातम्या बी दाबतो, तरी चर्चा तेचीच… हे कास काय?
सवाल नंबर तीन. हे थांबवाचो कसो?
*बारक्या प्रधान* : एकच जवाब! त्याले घेऊन घ्या आपल्या पार्टीत!
*महाराज* :ऑ?
©निरंजन मार्कंडेयवार