‘साहित्यगंध दीपोत्सव’ अंकाचे थाटात प्रकाशन
प्रा.कल्याण राऊत, प्रतीनिधी
लातूरः मराठवाडा प्रदेश लातूर नगरीमध्ये मराठीचे शिलेदार बहुद्देशिय संस्था,नागपूर व संमेलन आयोजक समिती लातूर यांचे वतीने एक दिवसीय कवीसंमेलन व पुरस्कार वितरण दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
सविस्तर वृत असे की,लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे साहित्यगंध दिपोत्सव अंक प्रकाशना निमित्ताने भव्य आदर्श शिक्षक पुरस्कार,साहित्यगंध पुरसकार आणि जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. संमेलन आयोजक टिम लातूर सर्वश्री संग्राम कवठेकर,प्रा.कल्याण राऊत, प्रा.शंकर वाघमारे, शिवाजी नामपल्ले,आण्णाराव नरसिंगे, दिनेश निलेंगेकर यांनी संमेलन अध्यक्ष माधव गाढेकरसर प्रमुख पाहुणे माजी खासदार सुनिल गायकवाड उपस्थित होते.
मा.राहुल पाटील सरांना भेट देऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली. शांततेत कार्यक्रमाची सांगता झाली.