
आनंद गाणार यांना साहित्यगंध पुरस्कार प्रदान
नागपूर: शहरातील हिंगणा स्थित वानाडोंगरी परिसरात वास्तव्यास असलेले आनंद गाणार सर पुरुषोत्त्तम विद्यानिकेतन बोरखेडी (रेल्वे) नागपूर येथे मागील २० वर्षापासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून, त्यांची शैक्षणिक उपक्रमासह साहित्य क्षेत्राशी अधिक घट्टपणे नाळ जुळून आहे. ते नागपूर जिल्हा ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांना यंदाचा साहित्यगंध पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आनंद गाणार, सौ ज्योत्सना गाणार, गुंजन व तेजस गाणार उपस्थित होते.