‘आम्ही साहित्यवारीचे प्रवासी’;श्रीमती सुधा मेश्राम

‘आम्ही साहित्यवारीचे प्रवासी’;श्रीमती सुधा मेश्राम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

झेंडा मराठीचा घेऊन हाती
निघालो वैदर्भीय आम्ही नारी
करण्या साहित्याची वारी
मराठवाड्यात गाजवू तुतारी…

🎍अर्जुनी/मोर. ते साकोली प्रवास…त्यानंतर साकोली ते नागपूर प्रवास…साकोलीच्या बसस्थानकावर असतांनाच रंजना ताईचा फोन…ज्या बसने तुम्ही प्रवास कराल त्याच बसमधे मी बसणार… म्हणून बसस्थानकावरून बस सुटताच रंजनाताई यांना फोन करून बसचा क्रमांक सांगितला. कारण ताई दिपवाळीच्या सुट्यांचा आंनद लुटण्यासाठी माहेरी म्हणजे लाखनीला आले होते. तारकाताई आणि मी कार्यक्रमाबद्दल हितगुजाच्या गोष्टीत गुंग झालो होतो. लाखनी बसस्थानकात गाडी थांबली. गर्दी खुप असल्याने आमची नजर ही रंजनाताईना शोधत होती. शेवटी ताई आमच्याच गाडीत चढल्या आणि लाखनी बसस्थानकावरून आम्हा तिघींचा नागपूर प्रवास सुरू झाला…!

💫 संजय दादांची शब्दसंजिवनी ‘मले का करा लागते’… प्रवासासाठी दिलेल्या टिप्स वाचत वाचत मनी हास्याचे चौकार,षटकार उडवत नागपूरच्या बसस्थानकात पोहचलो. तेथून रेल्वे स्टेशन गाठायचे होते. चंदूदादांचा फोन किनी मी तुम्हाला रेल्वेस्टेशनवर भेटतो तर शहारे दादांचा फोन की मी रेल्वेस्टेशन पोहचलो तुम्ही फलाट क्र. ७ वर या तेथे आपली ट्रेन लागणार. जवळपास आम्ही दीड,दोन वाजता रेल्वे स्टेशनला पोहचलो आणि एकदाचा सुटकेचा निःश्वास घेतला.

💐नागपूर कोल्हापूर गाडी ही लागलीच होती. आम्ही प्रतिभाताईची वाट बघत होते…. हळूहळू सर्वच तेथे जमा झाले सर्व आपापल्या डब्यात बसले होते आम्ही चार जणी एकाच डब्यात होतो. आणि ट्रेन हि ३:२० मिनिटांनी तेथून सुटली.आमच्या चार जणीला दोन सीट मिळाल्या होत्या एका सीटवर दोघी दोघी होऊन साहित्यांच्या वारीला निघालो… काही थोड्या अंतरावर गेल्यानंतर कळलं की बन्सोड दादा आणि संदीप दादांची ट्रेन मीस झाली होती. कुठेतरी मन चुकचुकल्यासारखे वाटत होतं. बन्सोड दादांना फोन लावला तर ते म्हणाले कि बसस्थानकावरून जाऊन चौकशी करतो आणि मिळाली एखादी बस तर आम्ही येतोय. दिपोत्सव सोहळा होता लातूर…. पाहण्यास सर्व होते आतूर… कारण माझ्या मराठीचे गुणगाणच न्यारे…अंगात मराठी साहित्याचेच भरले होते वारे…

(क्रमश:)
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles