‘मनोगत’; चंदू डोंगरवार अर्जुनी मोर.

‘मनोगत’; चंदू डोंगरवार अर्जुनी मोर.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“मोत्यांचे पीक घ्यायचे असेल तर शिंपले पाळावे लागतात.” अगदी या युक्तिप्रमाणे मा. राहुल पाटील सर यांनी मराठीचे शिलेदार समुह तयार करुन गेल्या काही दिवसापासून जो बेडा उचलून कार्य करत आहेत त्याला तोड नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारेच नव्हे तर देशातील काही राज्य व केंद्रशासित प्रदेशात राहणारे मराठी भाषिक आणि मराठीचा अभिमान बाळगणारे वसा जपणारे यांचेशी सांगड घालून मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. इतके निष्ठावंत व्यक्ती बघायला मला मिळाले आणि त्यांच्या या समुहाचा एक अल्पसा भाग म्हणून मला गेल्या सात वर्षांपासून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. या समुहात काम करताना शिस्तबद्ध नियम व सुचना या दोन्ही गोष्टी माणसाला, टापा बांधलेल्या घोड्यागत अनुभवायला मिळाल्या. ज्याप्रमाणे टांग्याला जुंपलेला घोडा हा त्याचा एक क्षणसुध्दा इकडेतिकडे बघून व्यर्थ घालवत नाही. अगदी त्याचप्रमाणे या समुहातील शिलेदार विषय सोडून व्यर्थ फाजीलपणा करु नयेत किंवा तसा प्रयत्नसुद्धा होता कामा नये… म्हणून अतिशय कठोरपणे शिस्तीने समुह चालवत आहेत याचा मला अभिमान वाटतो.

पाण्यात उतरल्याशिवाय त्याच्या खोलीचा अंदाज लागत नाही आणि पाण्याला बघून तृष्णा भागत नाही. तृष्णा भागवायला जलकुंभातील पाणी काढून पिण्यासाठी साधन आणि माध्यम दोन्ही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत त्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे तरच उद्देशपूर्ती होईल. अन्यथा पाणी जवळ असेन काढून पिण्याचे साधन नसेल तर व्याकुळ होवून प्राणास मुकावे लागेल त्याशिवाय पर्याय नाही. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मला या समुहातील अडीच कविसंमेलनाचे अनुभव आले. आता आहे ना विनोद… पण हे खरे आहे. दि.22 मे 2019 ला “पाऊलखुणा” मा. अश्वस्थामा मेश्राम सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा राज्य स्तरीय कविसंमेलन सोहळा अर्जुनी/मोर समता कॉलोनी बुध्द विहारात मोठ्या थाटामाटाने पार पडला होता. तेव्हा मी आयु. हंसराज खोब्रागडे सर यांचे मार्फतीने कविसंमेलनात उशिरा सहभागी झालो होतो. त्यावेळी संम्मेलनाध्यक्षा सौ. प्रतिमाताई नंदेश्वर मूल, जि. चंद्रपूर होत्या. …उशिरा सहभाग नोंदवल्यामुळे कार्यक्रमाचे शेवटी मला माझ्या दोन काव्यरचना सादर करण्याची संधी उपलब्ध झाली होती. परंतु येथील बरेचसे साहित्यिक / कवी रेल्वेचा प्रवास असल्याने लगबगीने निघून गेले होते. त्यावेळी मा. राहुल पाटील सर यांनी एका नवप्रविष्ठ महिला पोलीस उपनिरीक्षकांचे हस्ते सन्मानपत्र देवून माझा आनंद द्विगुणीत केला होता.

… आणि दुसरा दि. 27 फेब्रुवारी 22 रोजी सौंदड येथे झालेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात मला संधी प्राप्त झाली होती. यात मी “पाठिंबा ” ही काव्यरचना सादर केली होती . त्यावेळी “पुष्पगंध” कावितासंग्रहाच्या लेखिका पुष्पाताई डोनीवार चंद्रपूर या संमेलनाध्यक्षा होत्या. त्यावेळी मा. केवलचंद शहारे सर सौंदड यांचे हस्ते मला स्मृतीचिन्ह व संन्मानपत्र प्रदान करुन माझ्या लिखाण कौशल्याचे कौतुक केले होते. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरलेल्या असल्याने मला एक दिवस सुधाताई मेश्राम यांनी मराठीचे शिलेदार समुहात समाविष्ट करुन घेतले. तेव्हा पासून मी चारोळी, चित्र चारोळी, व काही दिवसांनी समुहातील विषयांवर काव्य रचना लिहीण्याचे प्रयत्न सुरू केले. आणि या तिन्ही समुहात कुठेतरी आपले स्थान जमविण्याचा प्रयत्न केला.

मला माझ्या रचना सादर करण्याची संधी मिळाल्याने व आवड निर्माण झाल्याने मी समुहात लिहित असताना मला शिस्तीचे महत्त्व कळले. माझ्या सारखा अत्यंत शिस्तीत घडलेला व्यक्ती जेव्हा समुहातील शिस्तभंग करत असल्याचे कुणाच्या तरी लक्षात आले तेव्हा मात्र मला शिस्तभंगाची शिक्षा म्हणून समुह सोडण्याबाबत सुचना मिळू लागल्याने मी भ्रमात पडलो, आणि विचार करून निर्णय घेतला कि, स्वतःला अपमाणित करण्यापेक्षा समुह सोडून दिलेले बरे.. अर्थातच मा. राहुल पाटील सरांचा उद्देश होता एक आदर्श शिलेदार घडवण्याचा मी काही दिवस नैराश्याने विचार करत आत्मपरीक्षण करु लागलो. कारण मला माझे वेगळे व्यक्तीमत्व घडवायचे होते आणि चित्र चारोळी समुहातील विषयावर चित्र बघून व निरीक्षण करून काव्यरचना लिहीत राहिलो…अर्थातच निष्ठा होती प्रामाणिकपणा होता म्हणून या समुहात शिस्त म्हणजे काय ? हे शिकून घेण्यासाठी पुन्हा सुधाताई यांनी मला सहारा दिला . व मा.राहुल पाटील सरांनी सुध्दा “लिहीत राहा” शिस्त कळेल असा लाखमोलाचा सल्ला दिला ..! आणि मी लिहीत राहिलो अगदी मनापासून. समुहातील माझ्या चित्र चारोळ्या, चारोळ्या, व काव्य रचना यांना सर्वोत्कृष्टतेचा बहुमान मिळत गेला त्यामुळे मला मनोगत लिहीण्याची संधी प्राप्त झाली व मी संधीचे सोने केले.

यावर्षी दि. 03/11/2022 रोजी झालेल्या लातूरच्या राज्यस्तरीय कविसंमेलनात व साहित्यगंध दिपोत्सव अंक 2022 चे प्रकाशन सोहळ्यात “साहित्यगंध” पुरस्कारासाठी माझी निवड झाली. ही पावती, हा सन्मान केवळ चंदू डोंगरवारचा नसून मराठीचे शिलेदार समुहातील एका प्रामाणिक व्यक्तीमत्वाचा आहे. त्याच्या सेवेचा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही..! आपण काम करत असलेल्या समुहातील विविध मान्यवरांचा आणि साहित्यिकांचा सहवास मला लाभला विविध विषयावर वेगवेगळ्या पद्धतीचे माझे लिखाण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण नसले तरी इतरांपेक्षा आगळेवेगळे जरुर असते. हे सर्व आदर्श वाचक मान्यवरांनी कुटुंब एपवर मनोगताचे माध्यमातून असो कि, मग ते काव्य, चारोळी लेखणातून असोत बहुतेकांनी अनुभवले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच मला प्रेरणादायी ठरतील यात तिळमात्र शंका नाही. आणि म्हणूनच मी जमेल तसे लिहीत असतो…! एक मराठीचा शिलेदार म्हणून ज्या समुहातील किल्लेदार मा. राहुल पाटील सरांसारखा आदर्श व्यक्तिमत्त्व असलेला बहुगुणी व्यक्ती व मार्गदर्शक आहे..!

✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर.
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles