‘शिवसेनेच्या वाघाला दिलासा’; संजय राऊत यांना जामीन मंजूर

‘शिवसेनेच्या वाघाला दिलासा’; संजय राऊत यांना जामीन मंजूर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: राज्यातील सत्तातरांनतर अनेक घडामोडी जलद गतीने घडून आल्यात. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज ( ९ नोव्हेंबर ) सुनावणी झाली. शिवसेनेच्या वाघाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करून काहीसा दिलासा दिला आहे.

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात आहेत. राऊत यांच्याकडून अनेक दिवसांपासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, पीएमएलए न्यायालयाने राऊत यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यावर आता संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास होता. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्या पाठीमागे आहे. संजय राऊत यांच्या जामीनाबाबत आम्ही आशादायी होतो. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये जाणे पत्करलं, ते कोणासमोर झुकले नाहीत,” असे सुनील राऊत म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles