
प्रसिद्ध कवयित्री सुनिता आंबेकर यांना ‘साहित्यगंध’ पुरस्कार प्रदान
खानवेल: मराठी काव्यक्षेत्रातील तसेच केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली , खानवेल येथील प्रसिद्ध कवयित्री शिक्षिका सुनिता लकीर आंबेकर यांना दि ०९/११/२०२२ रोजी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने देण्यात येणारा साहित्यगंध पुरस्कार ज्ञानमाता हायस्कूल खानवेल या शाळेतील मुख्याध्यापक रेव्हरंड फादर अॕशली कुतीनो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.