
जिल्ह्यातील महिलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबत विशेष काम करणार असल्याचे चित्रा वाघ यांचे प्रतिपादन
_भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ गडचिरोली दौऱ्यावर_
गडचिरोली: आपल्या राज्य दौऱ्या दरम्यान भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज गडचिरोलीत दाखल झाल्या. त्यांनी महिला मोर्चा पक्ष पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील पक्ष स्थितीचा आढावा घेतला.
गडचिरोली हा अतिदुर्गम आदिवासी व मागास जिल्हा असल्याने या भागातील महिला व मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक समस्या या वेगळ्या आहेत. येत्या काळात सरकारच्या माध्यमातून या संदर्भात विशेष काम करणार असल्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. राज्य सरकारच्या विविध योजना देखील तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.