मराठीचे शिलेदार समूह एक ‘व्यक्तांगण’; उर्मी घरत

मराठीचे शिलेदार समूह एक ‘व्यक्तांगण’; उर्मी घरत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“शब्दछायेच्या सहवासात नित्य
माझ्या लेखणीचा बहर फुलतो,
मिळते सकारात्मक येथे ऊर्जा
लिहील्याशिवाय समाधान नाही हेच मन जाणतो.”

आपल्या मराठीचे शिलेदार समूहात सतत मिळणारी ऊर्जा मुख्य प्रशासक सर्व सहप्रशासक यांच्या प्रेरक लेखणीने , मार्गदर्शनाने सदोदित समूहाच्या नवनवीन उपक्रमांतर्गत माझ्या लेखणीचे कौतुक होते , समूहाच्या प्रत्येक उपक्रमात मुख्य प्रशासक , परीक्षकांसह विविध सृजनांचे मनोगत यामुळे एक व्यक्तांगण लाभले आहे. जगभर कौतुक झाले तरी पारिवारीक कौतुकामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा अन् आनंद निराळाच असतो.

कामाचा वाढलेला ताण , शालेय जबाबदाऱ्यांचे भान या सर्वांमुळे कित्येक वेळा समूहातील काही काही संदेश वाचूनही वेळेत प्रतिसाद देता येत नाही, याची खंत वाटते तरी सतत लिहायचं हे ठरवल्यामुळे लेखणी सुधारते आहे, त्याचे कौतुकही होत आहे. माझ्या ‘वृक्षछाया’ चारोळीस सर्वोत्कृष्ट चारोळी उपक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट चारोळी निवडल्याबद्दल मी समुह मुख्य प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक, मार्गदर्शक या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.

या सर्वांचे कार्य, लेखन ,परीक्षण, आपुलकी , वक्तशीरपणा पाहीला की लिहायची उर्मी प्रबळ होते. मनावरचे मळभ सहज दूर होते अन् लिहायचं, लिहत राहायचं किमान चारोळी तरी लिहित राहायचं हे ठरवलं आहे. पुनश्च या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!!

सौ.उर्मी (हेमश्री) घरत पालघर सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles