शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेते चारोळीकार

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : काजव्याच्या राती*☄
*🍂शनिवार : १९ / नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*काजव्याच्या राती*

किर्रगर्द काळोख राती
भटकलो जंगलाती
साथ दिली किटकती
काजव्याच्या राती

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपुर*
*©सदस्या मराठीचे शिलदार समुह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

सुर्याची केली आरती अन्
चंद्राच्या केल्या वाती, अन्
तुला ओवाळाया भाऊराया
निघाले मी, या काजव्याच्या राती

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

मंद सांजेला निरव शांतता
जीव स्वच्छंद अधीर पारवा
काजव्याच्या राती लख्ख माळरानी
सोबत तुझ्या मनी गारवा

*सौ .उर्मी (हेमश्री) घरत पालघर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

काजव्याच्या राती
स्वयंभू काजवे चमकती
चमचम ती प्रकाशती
भासते दिव्य ज्योती….

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

येता काजव्याच्या राती
अनेकांना भावते नेत्रदीपक दृश्य
दूर जाते अंतरीची भीती
सर्वांनी एकदा अनुभवावे अवश्य

*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
*अंबरनाथ जि. ठाणे*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

काजव्याच्या राती
प्रेमी युगुल अनुभवते
दिसता लैला प्रकाशात
मजनूच्या आंनदास येई भरते

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

पाहिले एक स्वप्न तुझ्या सोबती
आनंदाची वाढली नकळत गती
तुझ्या सोबती काजव्याच्या राती
प्रेमात कधी प्रगती तर अधोगती

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

अंधारलेल्या विशाल आकाशात
झगमगाट काजव्याच्या रातीचा,
आसमंत प्रकाशमय झाले
मोह विलोभनीय दृश्याचा.

*दिनकर श्रीपती पाटील*
खोची जि कोल्हापूर
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*विषय – काजव्याच्या राती*

काजव्याच्या राती
सखे अश्या एकांती
चमचम त्या प्रकाशात
तुझी उजळे कांती

*सौ. रजनी भागवत*
ऐरोली, ठाणे
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
काजव्याच्या राती

गंधाळली सारी सृष्टी
उजळले आकाश तारे
सुरेख काजव्याच्या राती
वाहती प्रेमानंद वारे

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles