
कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांना ‘साहित्यगंध’ पुरस्कार प्रदान
नागपूर: येथील प्रसिद्ध कवयित्री, चित्रपट निर्माती, अभिनेत्री तसेच कस्तुरीगंध, प्राजक्तागंध व बकुळगंध कविता संग्रहाच्या लेखिका प्राजक्ता खांडेकर यांना यंदाचा साहित्यगंध पुरस्कार मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी रतन खांडेकर व कुमारी कस्तुरी खांडेकर उपस्थित होते.