
‘विच्छा माझी पुरी करा’ प्रयोगाने नाट्यरसिक मंत्रमुग्ध
नागपूर: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत ‘विच्छा माझी पुरी करा” या वसंत सबनीस लिखित आणि संजय वलीवकर दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग उत्साहात संपन्न झाला. प्रयोगास नागपुरातील नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर येथील नीलशोभा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले. यात नितीन पात्रीकर, प्रथमेश वलीवकर, निशांत अजबेले, डॉ. अनिकेत मुनशी, योगेश राऊत, प्रणाली राऊत, संजीव वलीवकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संगीत संयोजन डॉ. यादव गावळे, रूपाली ठाकरे, प्रकाश येवले, आणि जनार्दन लाडसे, वेशभूषा सचिन नारनवरे, प्रकाशयोजना एकांश करांडे आणि मिलिंद राहाटगांवकर, नेपथ्य समीर दंडाळे, निर्मितीसहाय्य प्रशांत खडसे, अशोक गवळी, धीरज अढाऊ, अमोल मोटेवार आणि प्रकाश शिवणकर यांचे होते.
नागपूर केंद्रात लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात संपन्न झालेल्या राज्य नाट्यस्पर्धेत बहुजन रंगभूमीच्या ‘गटार’ नाटकाने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.